पत्रकार कैलास घरत खारपाडा पेण प्रतिनिधी खारपाडा गावाच्या पूर्वेकडील समर्थनगर लागून असलेल्या खारपाडा सावरोली सर्व्हिस रोड ची दूरावस्था झालेली आहे. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खारपाडा पासून 10 ते 12 किलोमीटर वर असणाऱ्या ॲद्दिशनल पाताळगंगा एमआयडीसीमध्ये अनेक पुरुष आणि महिला कामगार या ठिकाणांहून दररोज जातात त्यात अनेक वाहनांची वर्दळ असते. खारपाडा ते चावणे गाव दरम्यान जवळजवळ 17 ते 18 मोऱ्यांची कामे केली परंतु मोऱ्यांच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित डांबरीकरण केलेले नाही दोन्ही बाजूला खड्डे पडले आहेत. वाहन चालक आणि चाकरमान्याना खड्यांचा सामना करीत जीव मुठीत घेवून गाड्या चालवाव्या लागतात. अनेक अपघात होत आहेत. या खड्डामुळे अनेकांना कंबरदुखी, मानदुखी आजारांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे.या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेक वेळा लेखी तक्रार, पत्र व्यवहार दे...