Skip to main content

Posts

Showing posts from February 1, 2025

धनगर समाज विकास मंडळाच्या वतीने " हळदी कुंकू आणि सांस्कृतिक " कार्यक्रमाचे आयोजन.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता कांदिवली पश्चिम येथील सह्याद्री नगर, गणेश मंदिर सभागृह या ठिकाणी धनगर समाजातील महिलां साठी " हळदी कुंकू व सांस्कृतिक" कार्यक्रम आयोजित केला आहे, असे मंडळाचे प्रवक्ते भारत कवितके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसारमाध्यमांना कळविले आहे.समाजातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा,संघटन वाढावे, महिलांना एकमेकांचा परिचय व्हावा, आणि यातूनच समाज कार्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन,दिप प्रज्वलन, विनम्र अभिवादन करून होईल, त्यानंतर महिलांचे हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील, अल्पोपहार व शेवटी कार्यक्रमाचा समारोप होईल.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गणेश जी हाके,निहारिका खोंदले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घराण्यातील सुजाताताई होळकर, ऋतू गंधा आदी उपस्थित राहणार आहेत.कांदिवली विभागातील धनगर समाजातील जास्तीत जास्त महिलांनी या हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम ला उपस्थित र...