Skip to main content

Posts

Showing posts from February 2, 2025

*कवी शिवदास वाव्हळ यांच्या 'उध्वस्त भिंती' या काव्यसंग्रहाचे ठाण्याच्या आनंद विश्व गुरुकुल मध्ये शानदार प्रकाशन*

ठाणे:- रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे आणि वर्ल्ड विधानसभा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नीलपुष्प काव्यसंध्या या कार्यक्रमात कवी शिवदास वाव्हळ लिखित हा काव्यसंग्रह राजसा प्रकाशन उल्हासनगर यांनी प्रकाशित केला असून आज या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नीलपुष्प साहित्य समुहाचे आणि सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा. राजेश साबळे, ओतूरकर, प्रमुख पाहुणे कवी मा. डॉ, मारुती नलावडे, आंतरराष्टरीय चित्रकार मा. सुरेश डुंबरे, वर्ल्ड व्हिजन संस्थेचे अध्यक्ष प्रा. नागेश हुलवळे, गायिका संगीत विशारद मा. सौ सुमुग्धा माळी आणि उपस्थित कवी, लेख साहित्यिक अनेक शैक्षणिक, सामजिक संस्थेतील वाचक रसिक मंडळी तसेच कवी शिवदास वाव्हळ यांचा परिवार आणि पाहुणे, मित्र परिवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदर प्रसंगी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन झाल्यावर कार्यक्रमाच्या पाहुण्या सौ सुमुग्धा माळी यांनी सुंदर ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविक सौ. मीनल चौधरी आणि पाहुण्याचा परिचय निवेदिका सौ. निलम शेलटे यांनी करुन देत असताना सर्व मान्यवरांचा यथोचित सन...

"मित्रांनीच केलं मित्राच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन "

“आम्ही संघवीकर”            संघवी केशरी कॉलेज            माजी विद्यार्थी (बॅच १९८७)    स्नेहमेळावा २५ जानेवारी २०२५. ..सरता सरता सरला ३७ वर्षांचा कालखंड तरी ह्या दोस्तांची मैत्री आजही आहे अखंड त्या मैत्रीला नाही कोणताच मापदंड एकजूटीचा दाखला देत पुन्हा जमले सारे देऊनी प्रतिसाद उदंड.श्रीमन् महासाधू मोरया गोसावी यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी ,श्री स्वामी समर्थ मंदिरा समोर,चिंचवडे गार्डन च्या निसर्ग रम्य आणि मनमोहक वातावरणात चिंचवडगाव येथे संघवी केशरी महाविद्यालयातील १९८७ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्स्फूर्तपणे साजरा झाला.शतकापार मिळालेला भरघोस प्रतिसाद आयोजकांनी घेतलेल्या पऱिश्रमाच्या यशाची पावती देणारा ठरला.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कॉलेज चे प्राचार्य कै.सुरवसे सर यांना आदरांजली वाहण्यात आली .क्षणभर सर्वजण सरांच्या आठवणीने भारावून गेले . या मेळाव्यात कार्यक्रमाची सुरवात चिंचवड गावातील युवा नेतृत्व भारत केसरी पैलवान विजय हनुमंत गावडे यांच्या व अमित पांढरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. दरवर्ष...