Skip to main content

Posts

Showing posts from September 13, 2024

राम सर्वगोड यांस लोकशिक्षक बाबा भारती साहित्य पुरस्कार प्रदान

  प्रतिनिधी  जगदीप वनशिव  सांगोला - येथे लोकशिक्षण बाबा भारती प्रतिष्ठान पुणे संस्थेच्या वतीने यावर्षीचा लोकशिक्षक बाबा भारती साहित्य पुरस्कार कवी लेखक गायक राम सर्वगोड यांना प्रदान करण्यात आला        अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला कवी राम सर्वगोड यांच्या काव्य साहित्यास पुरस्कार देवून गौरविण्यात आले समाजात भेडसवणारे प्रश्न काव्यातून मांडणारे प्रबोधन क्रांतीकारक विचार मांडणे वैचारिक मंथन करत समाज सेवा करणारे कवी समाजाचं देणं असतं पुरस्कार स्वीकारताना सर्व गोड म्हणाले  कविता जगताना आत्मिक समाधान मिळते विचार धन हे समाजाचे देणं असून वास्तवाचे भान समजले कि  वास्तव दर्शन घडते आपुलकी निर्माण होत जाते माणुसकी जिव्हाळा जपत असताना  जगण्याची उर्मी उर्जा कवितेतून मिळते असा आशावाद व्यक्त केला  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक लेखक समीक्षक पत्रकार रानकवी जगदीप वनशिव माणदेश कविवर्य डॉ लक्ष्मण हेंबाडे कविराज अनिल केंगार जिंदा दिल कवी गौसपाक...

कवी, निवेदक, मा. अँड. उमाकांत आदमाने यांना विद्या निकेतन (vsvss) सोशल फौंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ जाहीर

पुणे दि. २०ऑक्तोबर २०२४ रोजी कवी,लेखक, निवेदक, मा. अँड. उमाकांत मधुकर आदमाने (नोटरी, भारत सरकार) विद्या निकेतन (vsvss) सोशल फौंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ संस्थेचे अध्यक्ष / संस्थापक मा. श्री. शशिकांत कोचळे यांनी जाहीर केला.     कवी अॅड. उमाकांत मधुकर आदमाने मूळ गाव बोरगाव काळे, जिल्हा लातूर परंतु सध्या स्थायिक पुणे येथून विविध सामाजिक, शैक्षणिक, व साहित्यिक चळवळीत सक्रीय असे कार्य सतत करत आहेत. कवी अॅड. उमाकांत मधुकर आदमाने हे सन २००९ पासून शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय, पुणे येथे वकीली व्यवसाय करीत असून सन २०२० मध्ये त्यांची भारत सरकार नोटरीपदी निवड झालेली असून नोटरी व्यवसाय सुद्धा प्रामाणिक पणे करीत आहेत, वकिली व्यवसाया बरोबरच त्यांनी लॉकडाऊनच्या काळात साहित्यिक विश्वात यशस्वी प्रवास करत या अगोदर साहित्य क्षेत्रात ९५ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन, उदगीर, जि. लातूर येथे शांता शेळके कवी कट्टा वर आई या विषयावरील कविता मोठ्या दिमाखात सादर केली होती, ९६ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन, वर्धा येथे प्रा. देविदास सोटे कवी कट्टा वर नुसत्या तुझ्या असण्या...

'चांगुलपणाची चळवळ – एक चर्चासत्र

दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी 10.00 वाजता गुगल मीट वर 'चांगुलपणाची चळवळ – एक चर्चासत्र’ या कार्यक्रमाचे  आयोजन या चळवळीचे मुख्य स्तोत्र मा. डॉ. ज्ञानेश्वर मुळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. मा.डॉ. ज्ञानेश्वर मुळे सरांनी चालू केलेल्या या चांगुलपणाच्या चळवळीला विश्वातील प्रत्येक माणसापर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे. 'चांगुलपणाची चळवळ' या नावातच त्याचा व्यापक अर्थ दिसून येतो. 'सर्वजन सुखाय सर्वजन हिताय' या विचाराने फक्त महाराष्ट्र किंवा भारतातीलच नाही तर संपूर्ण विश्वातील लोकांना मुळे सरांनी प्रभावित केले आहे. चांगुलपणाच्या या चळवळीत संपूर्ण विश्वातील लोक जोडली गेली आहेत. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य व समता या उद्देशांना डोळ्यास‌मोर ठेवून चांगली माणस, चांगल्या संस्था आणि चांगले विचार यांना एकत्र करणारी ही ‘चांगुलपणाची चळवळ’ डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकजण विविध उपक्रमांतून  राबवत आहेत. 'चांगुलपणाची चळवळ – एक चर्चासत्र’ या चर्चासत्रामध्ये डॉ. ज्ञानेश्वर मुळे सर यांचे मुख्य मार्गदर्शन आपणा सर्वा...

*= रंगतदार कवी संमेलन कार्यक्रम

  *उरण- बोकड वीरा येथील श्री भ. पो. म्हात्रे. (गुरुजी) यांच्या निवासस्थानी गणपती निमित्त १०/०९/२०२४ रोजी निमंत्रित कवींच्या कवी संमेलनचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमास माननीय- मारुती सिंधू बागडे. (कर्जत), हरिश्चंद्र माळी (चिर्ले-उरण), गज आनन म्हात्रे. (करावे- नवी मुंबई), राम म्हात्रे. (उरण), सुचित्रा कुंचमवार. (नेरूळ- नवी मुंबई), अरुण द. म्हात्रे. (जासई- उरण), अनिल मुनघाटे. (नवी मुंबई), अशोक कुंचमवार (नेरूळ- नवी मुंबई) आणि भ. पो. म्हात्रे. उपस्थित होते.*              *सुपरिचित कवी गायक- मा. अरुण द. म्हात्रे. यांच्या मधुर आवाजात गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दोन कवींच्या कविता आणि कवी/गायक- अरुण द. म्हात्रे. व भ.पो. म्हात्रे गुरुजी यांची सून गायिका- सौ. सोनाली म्हात्रे. यांचे सुमधुर गीत गायन अशा क्रमाने पहिली फेरी पूर्ण झाली. तदनंतर चहा- पाणी- नाश्ता- गप्पागोष्टी करून दुसऱ्या फेरीस सुरुवात करण्यात आली. दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीस बासरी वादक- अरुण द. म्हात्रे. यांनी बासरीवर तीन/चार भक्ती गीते वाजवून...

*मुलींचा श्वास*

अल्पवयीन मुलींवरील बलात्कार व अत्याच्याराच्या घडनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुलींची सुरक्षा होणे गरजेचे आहे. समाजातील काही पिसाटलेल्या नराधमांच्या विक्रुतींमुळे मुली मोकळा श्वास घेण्यापासून वंचित आहेत. महाराष्ट्र कायद्याचा धाक जणू संपला की काय? अशी शंका वाटायला लागली आहे. लैंगिक अत्याचार हा एक चिंतनाचा विषय ठरत आहे.       जळगाव जिल्ह्यातील सावदा परिसरातील एका नामांकित शाळेत शिकणारी मुलगी ३० आँगस्ट २०२४ रोजी शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बसची प्रतिक्षा करीत असताना तीन तरुण एका मोटारसायकलवर येऊन मुलीला तिच्या मामाच्या गावाच्या ओळखीचा फायदा घेवून सावदा येथे पोहोचवतो असे सांगून मोटारसायकलीवर बसविले त्यानंतर या नराधमांनी त्या अल्पवयीन मुलीस घरी न सोडता सावदा-मस्कावद रस्त्यावरअसलेल्या एका तुरीच्या व कपाशीच्या शेतात दोघांनी आळीपाळीने पीडितेवर अत्याचार केले तर एकाने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याच आँगस्ट महिन्यात बदलापूर येथे एका शाळेत अल्पवयीन मुलीवर एका सफाई कर्मचा-याकडून अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच काल जळगाव जिल्ह्याच्या सावदा परिसरातील घटना...

"शासनाने धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.".. भारत कवितके

. भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात धनगर समाजाच्या उपोषणाचा पाचवा दिवस असूनसुद्धा शासनाने या कडे दुर्लक्ष केले आहे.राज्यात उद्भभवणरे प्रश्न सोडविणे मुख्य मंत्री यांचे काम आहे.पण धनगर समाजाच्या उपोषणाबाबत जणू आपल्या काहीच माहिती नाही अशा पद्धतीने शासन वागत आहे.धनगर समाजातील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी एका मुलाखतीत सांगितले की शासनाने धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, शासनाने धनगर समाजाच्या संविधान प्रविष्ट एसटी आरक्षण अमंलबजावणी च्या मागणी कडे गांभीर्याने पाहिले नाही.प्रसार माध्यमातून सर्वसामान्या पासून शासनापर्यंत सर्वजण पाहत आहेत.पण शासन मात्र या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवते.महाराष्ट्र राज्यातील अनेक लहान मोठ्या समस्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सोडविल्या आहेत.मग धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता अशी सावत्रपणाची भूमिका का घेतात? स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता सातत्याने संघर्ष च करावा लागत आहे.सत्त...