ठाणे: महाराष्ट्राच्या विविध भागातील नवोदित कवी कवयित्रींना एक उत्कृष्ट प्रायोगिक मंच मिळवून देण्याच्या उद्देशाने कवी अनुकूल माळी यांच्या संकल्पनेतून , कवी प्रदीप बडदे यांच्या मार्मिक नियोजनतून तसेच कवयित्री कल्पना देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली कवितेचा पार उभारला गेला. रविवार दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी सेंट्रल पार्क, घणसोली, नवी मुंबई येथे "कवितेच्या पारावर" या नव्या कोऱ्या मैफिलीचे देखणे प्रयोजन केले होते. हरवलेल्या रसिकांना शोधण्यासाठी तसेच कवितेच्या हरवलेल्या गोत्राला एकसुरी धाग्यात गुंफून नव्या रसिकतेचा शोध घेत ही कवींची मांदियाळी "कवितेच्या पारावर" आपला नाविन्यपूर्ण ठाण मांडून बसली होती. या देखण्या मैफिलीचा नवी मुंबईत हा दुसरा शुभारंभी प्रयोग मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनाला मनापासून साद घालत ठाणे,कुर्ला, दिवा, कल्याण, कोपरखैरणे, पनवेल, सानपाडा, नेरूळ, वाशी, घणसोली अशा विविध भागांतून कवींनी आपली प्रार्थनीय उपस्थिती दर्शविली होती. कविता आणि गाणी वेगवेगळ्या संकल्पनेतून सादर केल्या जाणाऱ्या ...