*गुरु ब्रम्हा गुरु विष्णु* *गुरूदेवो महेश्वरा* *गुरुसाक्षात परब्रम्ह* *तस्मै:श्री गुरवे नमः-----* माणसाची पहिली गुरु त्याची जन्मदात्री आई असते. त्यानंतर शाळेतील गुरु. ज्यांच्याकडून आयुष्याची जडणघडण शिकायची असते हातात हात घेउन अ आ इ ई ज्या गुरुने मला शिकवले. त्यांना आज माझे प्रथम नमन. कारण, आईला सोडून बाळ पहिली पायरी चढते. ती पायरी प्राथमिक शाळेची असते. अंगणवाडीत ते आईबरोबरच असतात संस्कार आणि बालपणाचे बाळकडू पिऊन प्राथमिक शाळेत येते. " नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा" गुरु बिना ग्यान नही हे मी शाळेत आल्यावरच शिकले. दररोज होणाऱ्या, प्रार्थने पासून रामरक्षा गणपती स्तोत्र. चाली नुसार कविता गायन मी गुरूकडून शिकले. ते माझे आचारी सर. आज ते हयात नाही. पण नकळत त्यांच्या चरणी मस्तक माझे नमले. सोज्वळ प्रसन्न चेहरा निखळ वाणी, रुबाबदार पेहराव आणि फणसासारखे वरून काटेरी असले तरी, आतून मऊ गऱ्या सारखे असणाऱ्या माझा गुरूंचा स्वभाव, साधी राहणी, उच्च विचारसर...