Skip to main content

Posts

Showing posts from October 26, 2024

शिर्डी बसस्थानकात धुरीमुळे प्रवाशांची डोळे दुःखी.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. शिर्डी महाराष्ट्र राज्यातील एक तिर्थक्षेत्र असलेले सतत साईभक्तांची वर्दळ असलेले एक प्रसिद्ध शहर.या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने भव्य दिव्य आकर्षक असे बस स्थानक बांधले . प्रवाशांना सुखसोयी युक्त असे शिर्डी चे बस स्थानक आहे.पण या बस स्थानकात तीन फेरीवाले आपल्या चणे , शेंगदाणे व इतर वस्तू विक्रीसाठी एका मडक्यात लाकडे, कोळसा जाळून चणे शेंगदाणे गरम करून विकत असतात,पण त्या धुराने स्थानकातील प्रवाशांना त्रास होतो, धुराने डोळे चुरचुर करतात, कोणी प्रवाशांनी त्यांची तक्रार केली तर ते उध्दट बोलतात, तरी येथील स्थानिक राज्य परिवहन महामंडळाने या बाबतीत लक्ष घालून या फेरीवाल्यांवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा प्रवाशी वर्गाचा एक ना एक दिवस उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.लवकरात लवकर या बाबतीत योग्य निर्णय घ्यावा,व प्रवाशांना होणारा त्रास कमी करावा.