Skip to main content

Posts

Showing posts from January 23, 2025

मी प्रतिमा,माझी प्रतिमा हा कवयित्री प्रतिमा काळेचा समीक्षणासाठी सप्रेम भेट दिलेला

मी प्रतिमा, माझी प्रतिमा  हा कवयित्री प्रतिमा काळेचा समीक्षणासाठी सप्रेम भेट दिलेला  कविता संग्रह संपूर्ण वाचला. समीक्षा पब्लिकेशन्स पंढरपूर ने प्रकाशित केलेला व संतोष घोंगडेंनी मुखपृष्ठ चितारलेला हा कविता संग्रह नितांतसुंदर झाला आहे. नवकवयित्रिचा पहिलाच कविता संग्रह आहे.त्या पेशाने शिक्षिका असल्या तरीही त्या उत्तम निवेदिका व संचलनकर्त्याही आहेत. चला धम्म आचरणात आणू  या कवितेत कवयित्री म्हणते, धर्म जातिभेद विसरून, प्रेमाची मशाल घेऊन  भूमीवर समृध्दी आणण्यास  बुध्द नव्याने घेवू समजावून जणू चला धम्म आचरणात आणू.. या कवितेत जातिभेद विसरून,बुध्द नव्याने समजावून घेऊन धम्म आचरणात आणण्याचा मनोदय व्यक्त करते. माझे बाबा,या कवितेत ती वडिलांच्या विषयी आदरभाव व्यक्त करताना म्हणते  बाबा सुगंधी कस्तुरी  खोल मायेचा सागर  विचारांनी आयुष्यात  भरी प्रेमाची घागर!! श्रावण कविता तर श्रावणमासी हर्ष मानसी,ह्या कवितेची आठवण करून देते. प्रेमाला देई उभारी निसर्ग, नागपंचमी सण,श्रावण. माहेरवाशीण माहेराला,  येईल आनंदाला उधान!! प्रितीचा गुलमोहर ...