Skip to main content

Posts

Showing posts from October 18, 2024

माझ्या धनगर समाजासाठी थोडं.... भारत कवितके

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम  आता विधानसभा निवडणुकी तोंडावर आल्या आहेत, कोणत्याही पक्षाला, नेत्याला वाईट बोलू नका, सत्ताधारी असो वा विरोधी पक्षनेते सर्वांनी आपल्या धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी चे घोंगडे भिजत ठेवले आहे.हे मान्य आहे,पण आपली लोकसंख्या दोन अडीच कोटी आहे म्हणतात तर आपले राजकीय नेतृत्व निर्माण का झाले नाही? याला जबाबदार राजकारणी तर आहेतच पण आपण सर्व जण ही तितकेच जबाबदार आहेत.धनगर समाजानी मनात आणले तर नक्की राजकीय घडामोडी मध्ये परिवर्तन होऊन आपला धनगर समाज राज्य कर्ता समाज म्हणून नक्कीच पुढे येईल.यात शंका नाही.या निवडणूकी मध्ये धनगर समाजाच्या उमेदवारास निवडून आणायची जबाबदारी तुमच्या आमच्या वर राहील.जो पर्यंत तुम्ही राजकीय नेतृत्व निर्माण करणार नाही तोपर्यंत तुमचे एसटी आरक्षण अमंलबजावणी सारखे प्रश्न सोडविणे कठीण आहे.कोणाचेही कोणी उणे धुणे धुत बसून वेळ वाया घालवू नका.फक्त धनगर समाजाच्या उमेदवाराचा प्रचार व प्रसार करा.वेळ फार थोडा आहे.रात्र दुश्मनाची आहे,काफील राहू नका.प्रत्येक वेळी संधी सोने घेऊन येईलच हे सांगता येत नाही पण आलेल्या संधीचे सोने करण्याचे ...