भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम सकल धनगर जमात, महाराष्ट्र राज्य आयोजित मुंबई आझाद मैदानात धनगर समाजाच्या सौ.जयश्रीताई श्रावण वाक्षे या महिला कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक 5 आक्टोंबर 2024 पासून धनगर समाजाला एसटी आरक्षण अमंलबजावणी व्हावी या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत.काम जुनेच पण नव्या दमाने करायचे,ना नेता ना पक्ष एसटी आरक्षण अमंलबजावणी हेच लक्ष या सकल धनगर जमातीच्या उद्देशाने प्रेरित होऊन सौ.जयश्रीताई श्रावण वाक्षे आमरण उपोषणाला बसणार आहेत. यांनी सर्व समाजातील पुरुष व महिला यांना आवाहन केले आहे की," मी आपल्या समाजासाठी मरायला तयार झाले आहे, समाज बंधु भगिनींनो तुम्ही एकत्र या" धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता वरचेवर आक्रमक होत आहे.महाराष्ट्राच्या विविध भागातून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने चालू आहेत.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 15 दिवसांची दिलेली मुदत संपून गेली, डॉ.सुधाकर शिंदे यांचा अहवाल अजून प्राप्त झाला नाही.त्यात आदीवासी समाजाचे आमदार खासदार धनगर समाजाला एसटी आरक्षण अमंलबजावणी करु नये म्हणून आक्रमक झाले आहेत.मंत्रालयाच्या संरक्षण जाळीत उड्या ...