Skip to main content

Posts

Showing posts from August 29, 2024

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...

*जातिनिहाय जनगणना परिषद : सामाजिक न्यायाच्या दिशेने एक पाऊल*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मुंबई कौन्सील) तर्फे ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता भूपेश गुप्ता भवन, प्रभादेवी, मुंबई येथे जातनिहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सुनिश्चित करण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा या परिषदेचा उद्देश आहे. परिषदेसाठी प्रमुख वक्ते सुरेश सावंत हे प्रसिद्ध राजकीय व सामाजिक अभ्यासक मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे असणार आहेत. प्रत्येक व्यक्तीला सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक आरक्षणात त्यांचा योग्य वाटा मिळावा यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहे. पक्षाचा असा विश्वास आहे की हा डेटा विविध समुदायांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि संसाधनांचे प्रभावीपणे वाटप करण्यासाठी आवश्यक आहे. ही मागणी जनतेपर्यंत नेण्यासाठी आणि जातनिहाय जनगणना करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी ही परिषद मोठ्या जनआंदोलनाचा भाग आहे.  भारतीय...

बोरीवली मध्ये ३१ आगस्ट विमुक्त दिनाचे आयोजन.भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम

शनिवार दिनांक ३१ आगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता बोरीवली येथील राजर्षी शाहू महाराज संस्कार केंद्र,स्व.शैलजाताई विजय गिरकर समरसता सभागृह, फुलपाखरू उद्यान, बोरीवली पूर्व या ठिकाणी विमूक्त घुमंतू जनजाती विकास परिषद ( अ.भा.)यांचे वतीने विमुक्त दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.३१ आगस्ट विमुक्त दिन साजरा करण्यात येणार आहे या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ.निहारिका खोंदले सचीव भाजपा मुंबई,व अध्यक्षा धनगर समाज एकता मंडळ, बबनराव मोहिते उपाध्यक्ष भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र, प्रमुख उपस्थिती भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम साहित्यिक व पत्रकार,लहू पवार सदस्य, मी वडार महाराष्ट्राचा,सौ.अर्चना लष्कर महिला अध्यक्षा मी वडार महाराष्ट्राचा, आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.या विमुक्त दिनाचे निमंत्रक सहदेव रसाळ अध्यक्ष मुंबई गिरीधर साळुंखे कार्यवाह मुंबई, महादेव रसाळ, मंगेश शिंगे,धृपद रवंदळे,उमेश जोशी, अशोक वाडेकर,मोहन अलकुंटे, संदेश रसाळ, गंगाराम क्षिरसागर,सुजीत गोसावी आदी विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद चे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत.