Skip to main content

Posts

Showing posts from August 7, 2024

*१८५७ नंतरचा सर्वात मोठा स्वातंत्र्यसंग्राम!*

(ऑगस्ट क्रांती दिवस विशेष.)     _आजच्या दिवशी- दि.८ ऑगस्ट १९४२रोजी रात्रीपासूनच भारतीय स्वातंत्र्य लढ्याची मनसुबे तयार झालीत. महात्मा गांधीजींनी छोडो भारत व करेंगे या मरेंगेचा नारा दिला होता. यामुळे संपूर्ण देश पेटून उठला. शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणार्‍या काँग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे हा क्रांतीदिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. ८ ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील शेवटचा दिवस म्हणूनही स्मरण केला जातो. म.गांधींच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलनाला या दिवशी सुरुवात झाली होती. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी गांधींसह ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण भारत इंग्रजांविरुद्ध एकवटला होता. देशावासियांच्या या एकजुटीने इंग्रज सरकारला गुडघे टेकायला भाग पाडले. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतर क्रांती दिन साजरा केला जाऊ लागला. मुंबईतील ज्या मैदानावर झेंडा फडकावत या आंदोलनाला सुरुवात झाली होती. त्या मैदानाला क्रांती मैदान हे नाव देण्यात आले आहे. भारतीयांनी पुकारलेला सन १८५७ नंतरचा हा सर्वात...

विश्वास व वागणूक

*ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो,ती माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटू लागतं.जवळच्या माणसांनी केलेली वागणूक फार जिव्हारी लागणारे असतात. त्यामुळे लौकिक अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी भावनिक पातळीवर कधीही न भरून निघणारी हानी झालेली असते. अश्या वेळी त्यांची सुध्दा काय अवस्था झाली असेल ह्याचा आपण विचार सुध्दा करत नाही फक्त आणि फक्त आपलाचं विचार आपण  करतो *माणसांवरचा विश्वास उडू लागतो अशाने फार हट्ट करावासा वाटत नाही मग कशात मनही रमत नाही, स्वभाव चिडचिडा होतो आणि कोणाहीसाठी अर्थात या पासिंग फेजेस असतात. त्या येतात आणि काही काळानंतर निघून ही जातात.अशा परिस्थिती समजून घ्यावयांच्या ऐवजी तुमच्यामुळे असे घडले म्हणून त्यास दोष देत असतो .आपण आपल्या मूळ स्वभावावर येतोच पुनःपुन्हा! *पण तरीही, फार जवळून अनुभवलं की प्रत्येकाचेच पाय मातीचे आहेत हे दिसू लागतं. मग आपण उदास होऊ लागतो. एवढ्यातेवढ्याने भारावून जाण्याचा आपला स्वभाव असू नये आणि कोणालाही त्या व्यक्तीशिवाय  आदर्श मानत बसू नये *माणसं म्हटली की वर्तमानात कमी जास्त गोष्टी...

वेड मन

वेड मन... माझं वेडंच आहे रे मन सख्या !  आवडतं कधीतरी मनासारखं वागायला  कारण तू आहेस ना मला सांभाळायला.... मनासारखे वागायचे ठरवते जरी   वाटते आहे रे या भिती जगाची  कारण लोकं असतात मागे बोलायला.... चूका  होतात न,  कधी अनावधानाने  कोणी आपल्या चुका पोटात नाही घालत  मग तूच तर आहेस  मला सांभाळून घ्यायला.... हो वागते मी लहान मूलीसारखी  मुलात मुल होऊन  आवडते मला त्यांच्यासारखे वागायला  आहेस की तू मी चुकले तर क्षमा करुन मन जपायला..!  आवडते मला वृद्धांची सेवा करायला   त्यांना गोष्टी सांगून त्यांचे मन रमवायला   आहेस तू मला तिथे घेऊन जायला...  पावलोपावली काटे जरी असले तरी   काट्यातनं वाट काढायला लावणारा सखा   आहेस सखा तू सोबतीला ... तू सोबतीला...  *वसुधा वैभव नाईक*   *धनकवडी, जिल्हा -पुणे*