Skip to main content

Posts

Showing posts from October 28, 2024

ऐन दिवाळीत शिक्षकांची गळचेपी

राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शिक्षकांना निवडणूक कार्यासाठी शाळेतून कार्यमुक्त केले. घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमने बिचाऱ्या शिक्षकांची अवस्था झाली आहे. 3 दिवस शाळा आणि 3 दिवस निवडणूक कार्य अशी तारेवरची कसरत करत गेले 2 महिने शिक्षक करत आहेत. 3 दिवस शालेय कार्य करत असताना त्यांना शालेय जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागल्या. सहामाही परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करून, सहामाही परीक्षा घेऊन निकालही लावून दिले. आणि आता ऐन दिवाळीत जेव्हा सर्व सणाच्या तयारीत आहेत तेव्हा हेच शिक्षक दारोदार भटकून मतदान करा म्हणून जन जागृती करत आहेत. यावरून हे सिद्ध होते की आपल्या समाजात शिक्षक - विद्यार्थी आणि शिक्षणाची कदर नाही.  प्रत्येक अशैक्षणिक कार्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शिक्षकांनाच सक्तीने शाळा सोडून त्या कामासाठी जुंपले जाते. आणि शैक्षणिक दर्जा घसरत चालला आहे म्हणून बोंब मारणारे प्रशासनातील अधिकारीच या साठी प्रथम जबाबदार आहेत. शिक्षक शाळेत शिकवू शकत नसेल तर शैक्षणिक दर्जा उंचावणार तरी कसा? शिक्षण मिळवणे हा राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे. म्हणून कोट्यावधी रुपये मोफत शिक्षणास...