Skip to main content

Posts

Showing posts from January 13, 2025

सहकार भारतीचा स्थापनादिन कल्याण मध्ये साजरा

 (अतुल फडके  - कल्याण) रविवारी १२ जानेवारी रोजी सहकार भारतीचा स्थापना दिन कल्याणच्या अभिनव शाळेत साजरा करण्यात आला ़सहकार भारती ही राष्ट्रीय संस्था असून भारतीय सहकार क्षेत्रात (१९७८)स्थापनेपासून कार्यरत आहे ़संस्थापक लक्ष्मणराव इनामदार यांनी या संस्थेची स्थापना केली ़११ जानेवारी १९७९ रोजी ही संस्था नोंदणीकृत झाली ़सहकारी सहकारी क्षेत्रांना प्रोत्साहन देणे, त्यांची कार्यक्षमता वाढवणे, सहकारी तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे ,ग्रामीण व शहरी भागातही या चळवळीचा विस्तार करणे ,व सहकारी संस्थांचे संघटन करणे, हे सहकार भारतीचे मुख्य उद्देश आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून या सहकार भारती संस्थेची स्थापना झाली असून "मूल्यांशिवाय सहकार्य नाही सहकार्याशिवाय मोक्ष नाही" असे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे़़ अशी संस्थेबद्दल माहिती एडवोकेट उज्वला पाटील यांनी दिली टेन्शनतरी सहकार भारतीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने १०मान्यवरांना "सहकार भूषण "पुरस्काराने गौरविण्यातत आले ़कल्याण जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनं...

'अशी भरली ग्रामसभा' नाटिकेची जिल्हास्तरावर निवड

श्रीरामपूर (प्रतिनिधी )--  जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित श्रीरामपूर पंचायत समिती तालुकास्तर सांस्कृतिक स्पर्धा अशोकनगर येथे मोठ्या उत्साहात घेण्यात आल्या.बालगटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडीच्या विद्यार्थ्यांची 'अशी भरली ग्रामसभा' ही विनोदी आणि प्रबोधनपर ठरणारी नाटिका तालुक्यात पहिली आली.या नाटिकेचे संवादलेखन आणि दिग्दर्शन उपक्रमशील शिक्षक रज्जाक शेख यांनी केले आहे. ही नाटिका जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी श्रीरामपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.जिल्हा स्तरावर निवड झाल्याबद्दल श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,विस्तार अधिकारी मंगल गायकवाड, केंद्रप्रमुख  आंबीलवादे, केंद्रसमन्वयक राजेंद्र केदारी, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक आणि शालेय व्यवस्थापन समिती माळेवाडी, शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे आदींनी अभिनंदन केले. ग्रामसुधारक उपक्रमांना आवश्यक आदर्श ग्रामसभेचे सादरीकरण बालकलाकार सोहम वमने,आर्यन बनसोडे, साई उमाप,यश वमने, अमन शहा ,सत्यजित उमाप, श्रीजीत लबडे, कृष्णा खिलारी, ओमकार ताके,गणेश पवार,...