सर्व प्रियजनांना सस्नेह नमस्कार शनिवार दि.२८ डिसेंबर २०२४पितळखोरा लेणी - अभ्यास दौरा (लेणी वर्णणासहीत)
*दान पारमिता फाऊंडेशन - नाशिक* या लेणी संवर्धक संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही सर्वजण अंदाजे १०० ते १२५ लोक पिताळखोरा लेणी येथे क्षेत्र भेट केली.निमित्त होतं एक दिवशीय कार्यशाळा.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुनील खरे सर आणि त्यांचं प्रतिरूप असलेले संस्थेचे मुख्य पदाधिकारी सन्माननीय संतोष अंभोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा सुव्यवस्थित संपन्न झाली.संस्थेच्या माध्यमातून आजवर हजारो विद्यार्थ्यांनी भारतातील प्राचीन धम्मलिपी ऑनलाईन पध्दतीने शिकून झाले आहेत.धम्मलिपी शिकविणे व लेणी संवर्धनासाठी कार्यशाळा घेणे असे उपक्रम संस्था नियमित राबवित असते.मी या संस्थेशी एक विद्यार्थी म्हणून जोडला गेलो व आज संस्थेचा एक पदाधिकारी म्हणून कामकाज करीत आहे याचं मला खूप अप्रूप व समाधान वाटतं.ही कार्यशाळा दिवसभर चालली.मुख्यपदाधिकाऱ्यांनी लेणीची अभ्यासपूर्ण माहिती उपस्थितांना सांगितली.धम्मलिपी मध्ये लिहलेले प्राचीन शिलालेख वाचून दाखवले त्याचं मराठी अनुवादही सांगितले.सदर शिलालेख धम्मलिपी मध्ये लिहलेले आढळत असून शिलालेखांची भाषा प...