Skip to main content

Posts

Showing posts from August 5, 2024

जीवनी आलो तर अर्थ पण समजून घेऊ - सौ. वसुधा वैभव नाईक.

         अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे आयोजित तिसरे राज्यस्तरीय राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलन याच्या संमेलन अध्यक्ष माननीय सौ.वसुधाताई नाईक, सुप्रसिद्ध साहित्यिका या होत्या.     संमेलनाचे उद्घाटन  अ. भा.म. सा. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रा. शरद गोरे यांनी केले.           .जि.संघटक,शिवसेना  मा. श्री. निलेश दादा काळभोर  व अ. भा. म. सा. प. उपाध्यक्षा श्रीमती शुभांगी ताई राजकुमार काळभोर हे होते.     मा.शरदजी गोरे यांनी आपल्या भाषणात माणसाच्या भावना,चेतना याचे बिजारोपण साहित्यिक करत असतात. माणुसकी हा एक धर्म आहे. आणि स्त्री-पुरुष ही जात आहे. लालसा कोणाच्याही मनात नसावी. स्त्रीचे स्थान खूप मानाचे आहे. त्याचप्रमाणे संमेलनाचा रथ अनेक साहित्यिकांच्या  हाताने पुढे नेला जातो असे त्यांनी सांगितले.   मा. सौ. वसुधाताई नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय  भाषणाला गणेश वंदनाने सुरुवात केली. स्वर्गीय राजकुमार काळभोर यांचा थोडक्यात परिचय दिला. हा सन्मान शरद गोरे या...