Skip to main content

Posts

Showing posts from January 11, 2025

*आभार...*

आभार मानणे' तशी एकदम सोपी गोष्ट पण आपण आभार मानण्यात खुपदा स्वतःचा कमीपणा मानतो आणी जिथे आभार मानायचे तिथेही आभार मानत नाही.. माझ्या मते आपण प्रत्येक क्षणी समोरच्याचे मनापासून आभार मानायची सवय लावून घेतली पाहीजे.. येणारा प्रत्येक क्षण आपल्या आयूष्यात काहीतरी नवीन घेऊन येत असतो.. आपल्याला काहीतरी देऊनच जात असतो, काहीही झाल तरी आभार मानत चला.. चांगल्या गोष्टीत तर मानायला हवेतच, पण अगदी वाईट गोष्ट घडली तरीही आभार मानायला विसरु नका.रस्त्यावरुन जाताना ठेच लागली तर त्या दगडाचे मनापासून आभार माना, कारण तो तुम्हाला नीट लक्षपूर्वक चालायला शिकवतोय. एखाद्या जवळच्या व्यक्तीने धोका दिला, फसवल तर त्याचेही आभार माना, तो तुम्हाला माणसं कशी ओळखायची हे शिकवते. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी चांगल कारण असतच.एखाद्याच्या  नजरेत जरी आपली किंमत शुन्य असली तरी कुणासाठी आपण अनमोल सुध्दा असु शकतो..आपली किंमत आधी आपण स्वतः ओळखण खुप महत्वाच असत.. आणी मग इतरांच्या नजरेत ती वाढवण्यासाठी प्रयत्नशील रहावं. अर्थात आपल्या मधील चांगल्या गुणांचा विकास करुनच केवळ हे शक्य आहे, हो ना....! हिरकणी सौ.अनिता ...