Skip to main content

Posts

Showing posts from October 11, 2024

समाजातील कर्तृत्ववान महिला

स्त्री ही बहीण ,आई, पत्नी, मुलगी अशा वेगवेगळ्या रूपात आपणास पाहावयास मिळते आजकाल खुरपणी पासून ते नासापर्यंत स्त्रिया कार्यरत आहे ,पुरुषापेक्षा जास्त ताणतणावात स्त्रियाच असतात त्यामुळे त्यांना किडनीचे आजार अधिक प्रमाणात होतात,अनेक गोरगरीब महीलाचे किडनी फेल प्रमाण अधिक असून त्यांच्या उपचारासाठी मी.नेहमीच मदत करत आसतो,आपले घर सांभाळून नोकरी करून मुलावर योग्य संस्कार करते ती आई असते         आजच्या स्त्री जीवनात विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात बदल झाले, त्याचे मुख्य कारण म्हणजे तिला सापडलेला मनाचा प्रकाश, फुले, आगरकर, कर्वे आणि इतर अनेकांच्या प्रयत्नातून तिला विद्यालयाची कवाडे उघडी झाली. पाटी पेन्सिल हातात घेतलेल्या स्त्रीने अगदी अल्प काळात विद्यापीठाच्या अंतिम परीक्षाही पार केल्या. आज एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कसोटी त पुढे आहे. कोणतेही काम तिला अशक्य राहिले नाही. अंतराळातील जाऊन पोहोचली. राजकारण, समाजकारण, शिक्षण सर्व क्षेत्र तिने यशस्वीरित्या पार केली. पण हे झाले असामान्य स्त्रीबाबत. सर्वसामान्य स्त्रीबाबत काय आढळते? ती पण सुविद्य झाली...

शीर्षक :- स्री मध्ये असते शक्ती अपार.

इतिहास आहे साक्षीदार रणरागिणीने शत्रू तुडवला शूर राणी लक्ष्मीबाईंनीच झाशीचा किल्ला लढवला...        मानवी प्राण्यात दोन प्रमुख जाती,त्या म्हणजे स्री व पुरुष.दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण.मानवी जीवन जर आपल्याला पृथ्वीतलावर हवे असेल तर या दोन्ही जाती टिकल्या पाहिजे,बहरल्या, फुलल्या पाहिजे.जीवन म्हणजे रथ आणि रथाची ही दोन्ही भक्कम चाके.जीवन सुरळीत,सुरक्षित चालण्यासाठी ही दोन्ही चाके व्यवस्थित,सुरक्षित,समानतेने चालली गेली पाहिजे.त्यासाठी महिला शिक्षितe होणे गरजेचे आहे."मेणाहून मऊ व वज्राहून कठीण महिला आहे".ती एकाच वेळी असंख्य कामे करत असते. "शिकलेली आई घरादाराला पुढे नेई ",असे, त्यामुळेच तर म्हटले जाते.सामर्थ्य,मातृत्व,दातृत्व,नेतृत्व,श्रद्धा,प्रेम, माया,शील,सहनशीलता,सेवा,समाशिलता इत्यादी गुणांचा तीe संपन्नशिल,वैभवशाली ठेवा,खजिना आहे. वार नाही तलवार आहे... ती समशेरची धार आहे... ती सबला नार आहे... ती धगधगता अंगार आहे... ती सृजनशील विचार आहे... ती प्रगतीचा उंच आलेख आहे... ती विश्वाची जननी आहे..3            इतिहासातही डोकावून पाहिले तर अ...

*अन् वाचले मातेसह नवजात अर्भकाचे प्राण मर्जिया पठाण यांनी दिला मानवतेचा धडा

  नेहाल हसन ठाणे मुंब्रा- आज माणसे एवढी निग्गरगट् झाली आहेत की शेजारी वेदनेने माणूस तळमळत असतानाही ढुंकूनही पहात नाहीत. मात्र, मुंब्रा येथील सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांनी रस्त्यावर वेदनेने तळमळणार्या गर्भवतीला ओळखपाळख नसतानाही उचलून रूग्णालयात दाखल केले अन् तिचे बाळंतपण केले. मर्जिया यांच्या या मानवतावादी दृष्टिकोनाचे सर्वत्र कौतूक होत आहे.  मुंब्रा येथे राहणारी रोशनी काळे ही गर्भवती महिला मित्तल रोड परिसरात काही कामानिमित्त आली होती. मात्र, अचानक तिला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. प्रचंड वेदना होऊ लागल्याने रोशनी रस्त्यावर पडली. मात्र, आजूबाजूला कोणीही मदतीसाठी धाऊन गेले नाही. त्याचवेळेस आपल्या अमृतनगर येथील कार्यालयात बसलेल्या मर्जिया शानू पठाण यांना ही माहिती मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट मित्तल रोड गाठले. तिथे पोहचताच मर्जिया पठाण यांनी आधी रोशनी यांना धीर दिला. स्वतः गाडीमध्ये उचलून बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेदनेमुळे रोशनी हिस  गाडीत बसणे अशक्य होत असल्याने एक रिक्षा थांबवून त्यातून रोशनी हिला कौसा रूग्णालयात दाखल केले. डाॅक...

राज्यस्तरीय तिफण कविता महोत्सव स्वागताध्यक्षपदी गणेश घुगे

कन्नड: ( प्रतिनिधी ) त्रैमासिक तिफण व भाषा साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा कन्नड यांच्या वतीने श्रीक्षेत्र भगवानगड मेहगाव ता. कन्नड येथे आयोजित सातव्या तिफण राज्यस्तरीय कविता महोत्सवाच्या स्वागताध्यक्ष पदी साहित्यप्रेमी, युवानेते गणेश घुगे यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नवोदित कवी, साहित्यिक, लोककलावंत यांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळून प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तिफण राज्यस्तरीय कविता महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आता पर्यंत कन्नड तालुक्यातील वाकी, हतनूर, बहिरगाव, कन्नड, तेलवाडी आदी ग्रामीण भागांत तिफण कविता महोत्सव घेण्यात आले आहेत.  तसेच दरवर्षी तालुक्यातील जेष्ठ साहित्यिकांना तिफण साहित्य सन्मान देऊण गौरविण्यात येते. या वर्षी पासून राज्यस्तरीय तीन साहित्य, कविंना ही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 2025 मध्ये आयोजित राज्यस्तरीय तिफण कविता महोत्सव नियोजनार्थ दि. 10 आक्टोंबर रोजी शिवाजी महाविद्यालय कन्नड येथे प्राचार्य डॉ. विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद...