Skip to main content

Posts

Showing posts from November 12, 2024

भव्य रांगोळी प्रदर्शन अस्मिता संस्थे द्वारे आयोजित

  दरवर्षी प्रमाणे यंदाही अस्मिता सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक कार्य करणारी संस्थेमार्फत जोगेश्वरी येथे भव्य रांगोळी स्पर्धात्मक प्रदर्शनाचे आयोजन कारण्यात आले आहे.  श्री. विनायक पेडणेकर, श्री.सुधीर गोरे ह्यांच्या सहकार्याने आणि श्री संकेत भगत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन रांगोळी कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्या कलेला वाव देण्याचा प्रयत्न ही संस्था करीत आहे. या वर्षाच्या  रांगोळी  प्रदर्शनात प्राप्ती  पेडणेकर, रोहिणी जाधव, सुजाता सैल, मिताली गार्डे, शुभम जाधव, त्रिशला रहाटे, करण पांचाळ, सायली खानविलकर, मयुरेश सुर्वे, वैभव काशीकर, निधि पावसकर, चंद्रशेखर पांचाळ, आस्था बाथरे, सुचिता सुतार, ऋषी गौरत, निखिल गुरव, वृध्दी मोरजकर ॲड. रोहिणी जाधव इत्यादी रांगोळी कलाकारांनी आपली कलाकृती सादर केली आहे. सदर प्रदर्शनाला मराठी, चित्रपट आणि मालिका मधील कलाकार  भेट  देणार  आहेत.  हें प्रदर्शन मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर ते रविवार दिनांक १७ नोव्हेंबर पर्यंत संध्याकाळी ६ ते ९  ह्या  वेळेत प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे स्थळ :...

'शब्द माझे तुझ्याचसाठी' काव्यसंग्रह आणि 'मयूरस्पर्श ' चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा थाटात संपन्न

   सर्वपरिचित कवयित्री, समाज कार्यकर्त्या सौ. अश्विनी सचिन बोलके यांच्या 'शब्द माझे तुझ्याचसाठी' या काव्यसंग्रहाचे आणि  निवेदक, गायक अभियंता कवी मयूर महादेव पालकर यांच्या 'मयूरस्पर्श' चारोळी संग्रहाचे प्रकाशन अभियंता भवन नवीन पनवेल येथे दिनांक ९ नोव्हेंबर २०२४ रोजी ज्येष्ठ साहित्यिक - सुप्रसिद्ध गझलकार ए.के. शेख तसेच प्रमुख मान्यवर म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत अध्यक्ष - ज्येष्ठ पत्रकार श्री. दुर्गेश सोनार, कवयित्री, शिक्षिका सौ.मानसी नेवगी, साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे आणि सबोर्डीनेट इंजिनीअर असोशिएशनचे अध्यक्ष संजय ठाकूर अशा दिग्गज मान्यवरांच्या आणि आप्तेष्ट व कुटुंबियांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला.  दुर्गेश सोनार यांनी कवयित्री अश्विनी बोलके यांच्या 'शब्द माझे तुझ्याचसाठी' या पुस्तकाबद्दल,*"या काव्यसंग्रहातील कविता सकस, सशक्त आणि सामर्थ्यशाली आहेत तसेच हा काव्यसंग्रह असला तरी संपूर्ण पुस्तक वाचून पूर्ण व्हायला दोन ते तीन महिने लागू शकतात,इतक्या त्या विचार करायला लावणाऱ्या आहेत."* असे बोल व्यक्त केले. *"मनास ह...