ग्रामजीवनातून वर आलेले आणि ग्रामीणतेशी जवळीक असणारे अनेक साहित्यिक साहित्याच्या माध्यमातून ग्रामजीवनाचे सर्वांग सुंदर चित्र रेखाटताना आढळतात. त्यातीलच एक उदयोन्मुख कवी श्रीराम घडे यांचा नामोल्लेख करावा लागेल मराठी साहित्याच्या प्रवाहामध्ये अनेक साहित्यकृती निर्माण झाल्या आणि त्या लोकप्रिय ही झाल्या विशेषता ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण कवितेला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे .याच परंपरेचे समृद्धीकरण करणारी साहित्यिकांची नवी पिढी साहित्याच्या क्षेत्रात आश्वासक साहित्य निर्मितीचे कार्य करीत आहेत .आणि त्यांच्या साहित्याचा वाचक वर्ग ही गुण दोषा सहित स्वीकार करतात .अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाचा प्रसार खेडयापाड्यातही झपाट्याने झाला आणि खेड्यातल्या खेडूत माणसाच्या जगण्याचे चित्र बदलू लागले .अनेक खेड्यातील सुशिक्षितांची पिढी शहराकडे धाव घेऊ लागली नोकरीच्या निमित्ताने शहरात वास्तव्यास असणारी ही सुशिक्षित पिढी खेड्यातील जनजीवन ,शेत -शिवार ,गुरंढोरं , पेरणी, कुळवणी ,नांगरली ,काढणी मळणी , ख...