३ डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या २४८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन भारत कवितके....
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. ३ डिसेंबर २०२४ रोजी महाराजा यशवंतराव होळकर ( प्रथम) यांच्या २४८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात येणार असल्याचे मुंबई कांदिवली पश्चिम येथील धनगर समाजाचे पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी कळविले आहे.महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत, पुणे जवळील वाफगाव किल्ले या ठिकाणी ३डिसेंबर १७७६ साली महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म झाला, त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी होळकर होते,आईचे नाव यमुनाबाई होते, यमुनाबाई या तुकोजी होळकर यांच्या दासी होत्या.काशिराव, मल्हारराव, आणि विठोजीराव हे महाराजा यशवंतराव होळकर यांचे थोरले बंधू.६जानेवारी १८०५ साली राज्याभिषेक सोहळा करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले.महाराजा यशवंतराव होळकर हे एक कर्तबगार वीर पुरुष होते.भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते,संकटाची वादळे, युध्दाचा सतत झंझावात,सतत विजयाची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवून...