म्हणतात ना सर्व भेटी या आधीच ठरलेल्या असतात..त्या जीवनात जेव्हा होणार असतात तेव्हा च होतात. कोरोना काळात आपण स्वतः ला वेळ द्यायला लागलो....म्हणजे माझ्या दृष्टीने स्वतःला गुंतून ठेवू लागलो.आहे तो दिवस आनंदातच घालवायचा ...समोर कितीही कठीण प्रश्न आले तरी.जीवन एकदाच मिळते... हे सर्वांना माहिती.आपल्यातील कलागुण याच काळात आपण मानसोक्त पण पूर्ण करू लागलो.आणि लिखाणाकडे अलगद मी वळले गेले.जो माझ्या जगण्याचा एक सच्चा मार्ग बनला.याच मार्गाने जाताना खुप अफलातून व्यक्तींना भेटले.....त्यांचे विचार समजून घेतले..त्यांना जाणले..त्यांना कवितेतून,कथेतून,लेखातून,भाषणातून ...म्हणजे साहित्यातून समजून घेण्याचा अल्पसा प्रयत्न केला.या व्यक्तींच्या अंतर्मनात जाण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला. यातील किंवा यापेक्षाही वेगळे व्यक्तिमत्त्व भावले मनाला ते म्हणजे माननीय सदाफुले सर तुम्ही.तुम्हाला साहित्य ,साजिक स्तरातील सर्वच जण मामा,मास्तर म्हणतात... आणि याच नावाने आवाजही देतात.माझ्या साहित्यिक मित्र परिवाराकडूनही तुमचे नाव नेहमी ऐकले होत...