Skip to main content

Posts

Showing posts from October 8, 2024

*रस्ता दुरुस्ती मागणीसाठी पत्रकारच उतरले रस्त्यावर*

    जळगाव [ राजेंद्र चौधरी ] :-  रस्त्याच्या दुरुस्ताची सतत मागणी करुन व संबंध अधिका-यांनी लेखी आश्वासन देऊनही रस्त्याच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याच्या दुरुस्ती व रस्त्याच्या आजूबाजूला पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंट गटारींच्या मागणीसाठी जळगाव जिल्ह्याच्या सावदा व सावदा परिसरातील पत्रकारांनाच जनहितार्थासाठी अक्षरशः रस्त्यावर उतरुन रस्ता रोको आंदोलन दुसऱ्यांदा करावे लागले. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनहितार्थ रस्त्यावर उतरुन लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करावे लागले.       ब-हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर खड्ड्यांमुळे चाळणी झाली असून प्रकल्प अधिका-यांच्या सांगण्यावर अभियंता चंदन गायकवाड यांनी गेल्यावर्षी जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे झालेल्या पत्रकारांच्या उपोषणावेळी लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ववत न झाल्याने ८ आँक्टोबर मंगळवार रोजी रावेर तालुक्यातील सावदा येथे ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाऊंडेशन व  पत्रकारांच्या वतीने दुसऱ्यांदा सावदा येथे आठ तासांचे रस्ता रोको आंदोलन चालले. प्रकल्प अधिकारी ...