मैत्री कट्टा कवी मनाचा साहित्यसमूह महाराष्ट्र या समूहाचे तिसरे साहित्य संमेलन दिनांक ९/०२/२०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
हे साहित्य संमेलन प्रसिद्ध कवी/ व्याख्याते/ निवेदन मा. गजानन उफाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपशिक्षणाधिकारी मा.निता श्रीश्रीमाळ, विस्तार अधिकारी मा. विद्या दीक्षित, विशेष अतिथी म्हणून केंद्रप्रमुख मा.अनिल साखरे ,ज्येष्ठ कवी डॉ. शिवा प्रधान व मा .दत्तात्रय भोसले, प्रमुख अतिथी म्हणून मा.भालगडे सर उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर आपल्या प्रास्ताविक भाषणात स समूहाच्या संस्थापिका अल्का धोंडणे- साखरे यांनी समूहाचा आलेख वाचून दाखवला. दीपोत्सव मैत्रीचा या दिवाळी अंकाचे प्रकाशन व साहित्य क्षेत्रात आपल्या कार्यातून कवितेतून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कवियत्री यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्घाटक नीता श्री श्रीमाळ व विद्या दीक्षित यांनी यावेळी कार्यक्रमास भरभरून शुभेच्छा दिल्या. डी. आर. बांगर सरांचे बदल या विषयावरचे कथाकथन प्रभावी ठरले. शिवा प्रधान यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळ व आजचा युवक यावरील परिसंवाद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. भोजन कालावधीत सुगम संगीतां...