प्रसिद्ध कवी.संदीप पवार यांचा समाजभान जागृत करणाऱ्या ' प्रतिकार ' काव्यसंग्रहाला सरकारमान्य मराठी साहित्य मंडळाचा " राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार " जाहीर
नुकताच आदर्श शिक्षक प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराने सन्मानित झालेले प्रसिद्ध कवी संदीप पवार लिखित व पलपब प्रकाशनद्वारा प्रकाशित समाजभान जागृत करणारा ' प्रतिकार ' काव्यसंग्रहाला मराठी साहित्य मंडळाचा " राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार " जाहीर झाला आहे .हा पुरस्कार ३ ऑक्टोंबर रोजी ठाणे येथे पुरस्कृत करण्यात येणार आहे . कमी कालावधीत जनमाणसात पोहचलेला काव्यसंग्रह वाचकांच्या मनात ठाव घेतल्याशिवाय राहत नाही.' प्रतिकार ' या काव्यसंग्रहाचे यश आणि कवी.संदीप पवार यांच्या साहित्य सेवेचे कौतुक म्हणून पलपब पब्लिकेशनद्वारा यावर्षी त्यांना "राज्यस्तरीय पलपब जीवन गौरव पुरस्कार २०२४ ने गौवरव करण्यात आला .प्रतिकार काव्यसंग्रहाचा आलेख आणखीनच वाढत चाललेला आहे .या काव्य संग्रहाच्या प्रती वाचकांसाठी पलपब बुक स्टोरवर आणि अमेझॉनवर उपलब्ध आहे .तसेच संदीप पवार यांच्या व्हॉट्सअँप नंबर ९२०९७७७७८५ या क्रमांकावरून कॉल करून आपली प्रत मागवू शकता . लिमिटेड स्टॉक उपलब्ध आहे .