Skip to main content

Posts

Showing posts from February 3, 2025

शीर्षक - तू....

जेव्हा जीवन सुंदर बहरलेले असते तेव्हाच अचानक वावटळ यावी आणि सारे होत्याचे नव्हते होणे काय घडते हे समजण्याच्या पलीकडील ज्यांच्या सोबत इतके वर्षे आपण विश्वासाने राहतो अन् तीच व्यक्ती अचानक आपल्या जवळून,आपल्या डोळ्यासमोर कोणीतरी कायमची दूर घेवून जातो  आपल्याला पूर्ण एकटे कडून काय मिळते या नियतीला  घराचे सारे घरपणच निघून जाते जो दरारा असतो भोवताली तो ही त्या सोबत नाहीसा होतो.. एखाद्या आश्रितासारखं जीवन होवून जात..  दोन फुले आताच कोठे कळी तून बाहेर आलेली असतात त्यांना भक्कम आधारावर बहरायचे असते पण,तो त्यांचा आधारच काढून घेतला जातो दोन्ही चाकापैकी एक चाक जेव्हा निखळते तेव्हा जीवन रथ एक चाक किती दिवस हाकणार ना? कसोटी कायमच पाचीला पुजलेली असते का? हीच का सटवी जी सर्व काही लिहून जाते पाचवीला.. ते ही काहीच व्यक्तींच्या बाबतीत... काही खूप भाग्यशाली असतात.. त्या फुलांचा काय दोष असतो.. त्यांना यांनीच जन्माला घातलेलं असते आणि मध्येच एखादा त्यांना पोरका करून जातो तेव्हा त्यांनी कोणाकडे पहायचे? ते चाक जर स्व बळावर चालत असेल तर ठीक नाहीतर रोजच्या जगण्याचा प्रश्न? भाकरीचा प्रश्...