कन्नड तालुक्याला समृद्ध असा नैसर्गिक , ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अनेक गावात नाटय कलावंत असून त्यांनी ही नाटयपरंपरा आजही जिवंत ठेवली आहे. जागर गोंधळ, कीर्तन, भारूड आदी लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे काम करणारे मान्यवर येथे आहे. आदिवासी ठाकर, भिल्ल आणि बंजारा हे समुदाय आजही आपले सांस्कृतिकपण जपतांना दिसतात. गणेश उत्सव, नवरात्री उत्सव आणि गावोगावी होणाऱ्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तालुक्याचे भूमिपुत्र मा. मानसिंह पवार यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने कन्नड तालुका महोत्सव, लोकतेने बाळासाहेब पवार सांस्कृतिक उत्सव आणि आता सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालयाच्या माध्यमातून सहकार महर्षी बाळासाहेब पवार संगीत महोत्सव, फिल्म फेस्टिवल, व्याख्यानमाला तसेच इतर कार्यक्रम सातत्याने होत आहेत. जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचा जिजाऊ महोत्सव, पिशोरच्या समता विद्यालयाचा समता महोत्सव हे तालुक्याच्या नावलौकिकात महत्वाचे योगदान देत आहेत. कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयाचा मराठी विभाग साहित्यिक कार्यक्रम घेव...