Skip to main content

Posts

Showing posts from December 2, 2024

अंगुलिमाल उराडे यांच्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा"हे विश्व शब्दांचे" या नावातच व्यापकता

सुनील शिरपुरे/यवतमाळ चंद्रपूर:-१ डिसेंबर २०२४ रोजी साहित्याच्या जगात एक नवे प्रकाशकिरण घेऊन येणारा "हे विश्व शब्दांचे" हा कवितासंग्रह आनंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय बेंबाळच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात प्रकाशित झाला. चंद्रपूर मधील मुल तालुक्यातील बेंबाळ गावातील उदयोन्मुख लेखक कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांच्या "हे विश्व शब्दांचे" या कवितासंग्रहाने ग्रामीण साहित्य क्षेत्राला एक नवी ओळख मिळवून देत आपली पहिली आणि लक्षवेधी उपस्थिती दर्शवली आहे.             या सोहळ्याचे आयोजन मा. अंगुलिमाल मायाबाई उराडे व मित्रपरिवार तर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचं दोन सत्रामध्ये विभागणी करून पहिल्या सत्रात "हे विश्व शब्दांचे" या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा व दुस-या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. विद्याधर बन्सोड होते, तर उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. इसादास भडके यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नामांकित साहित्यिक मा. प्रशांत दामले, आनंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श...

*५० तास अखंड वाचन यज्ञात झाला,**आगरी बोली कवितांचा जागर*

 प्रतिनिधी / कल्याण           आगरी बोलीतील कवितांची गोडी आज कल्याणकरांना अनुभवता आली. निमित्त होते अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित सलग पन्नास तासांचा अखंड वाचन यज्ञ हा कार्यक्रम. यावेळी आगरी कवींनी विविध आशयाच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.           आगरी कवितांचा हा कार्यक्रम तीन सत्रात घेण्यात आला. यात कविता, चारोळ्या, पारंपारिक गीते, लग्न गीते, धवला असे आगरी साहित्यातले विविध प्रकार हाताळण्यात आले. या कवी संमेलनात कवितांना पार्श्वसंगीत देण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. यासाठी संगीत संयोजक 'आपला बंड्या' यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्रा. एल. बी. पाटील सर, प्रसिद्ध साहित्यिक अनंत शिसवे, प्रसिद्ध साहित्यिक कैलास पिंगळे या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या संपूर्ण पन्नास तासांच्या सत्रात कविता वाचन, कथाकथन, अभिवाचन असे सत्र सुरु होते.         या संपूर्ण कार्यक्रमा...