सुप्रभा वेळी मंद वाहतो वारा सुगंध सारा निसर्ग लिला आरोग्य मंत्र खरा जपावा जरा बेधुंद धरा सृष्टीचे वरदान दिसते छान हिरवा शालू धरा नेसून आली गंधित झाली गोड सुंदर दिसे धरा गोजिरी वधू लाजिरी ✍️®©सुलभा भोसले शिर्डी अहमदनगर