समाज परिवर्तनाचे विचार साहित्य आणि कलेतून लोकांपर्यंत घेऊन जावे – कवी.विनोद अष्टुळ महामानवांनी केलेले कष्ट, त्याग आणि दिलेले परिवर्तनवादी विचार साहित्यातून समाजापर्यंत पोहोचण्यासाठी कवींनी आणि गायकांनी सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विविध उपक्रमांतून आपल्या कविता आणि गीतातून समाजाला प्रबोधन करणे आवश्यक आहे. असे अध्यक्षीय भाषणात कवी विनोद अष्टुळ यांनी आपले मत व्यक्त केले. महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आयोजित महामाता रमाई महोत्सव २०२५ मध्ये रमाईच्या लेकरांचे कवीसंमेलन वाडिया कॉलेज समोर पुणे येथे संपन्न झाले. हे साहित्य सम्राटचे १९९ वे कवी संमेलन होते. त्यावेळी अष्टुळ बोलत होते. विचारपीठावर स्वागताध्यक्षा मा. लताताई राजगुरू, ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनाग्रा, विशेष अतिथी मा.रवींद्रअण्णा माळवदकर, ज्येष्ठ समाजसेवक दादासाहेब सोनवणे, तुकाराम डावरे रा.अध्यक्ष केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग भारत सरकार नवी दिल्ली, संमेलन अध्यक्ष विनोद अष्टुळ, आणि मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड उपस्थित होते. कवी आणि संम...