हा हा मी मी बोललचं पाहिजे आज नाही तर कधीच मी बोलू शकणार नाही हे मलाही अन् तुम्हालाही चांगलेच माहिती आहे माझा आत्मा गेल्यावर फक्त बॉडी राहील शिल्लक ती काय बोलणार,काय विचार करणार?ती फक्त सरणावर जळणार किंवा या मातीत,कबरेत बंदिस्त होणार म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे.. आज नाही तर कधीच नाही... मला जन्म देण्यासाठीही तू एक स्री असूनही किती विचार करते? देवू का नको या स्री गर्भाला जन्म म्हणून आतून काय आणि कसे सांगू ग आतून किती मी तुटते किती मी ढासळते,कोसळते,अन् पुन्हा स्वतः स सावरते माझाच जन्म एका स्त्रीला सुद्धा नकोसा झाला? कोठे मागणार मी दाद सांगा तुम्हीच मला म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे.. आज नाही तर कधीच नाही... धन्य मायबाप ,अखेर दिला ओ तुम्ही मला जन्म पण,रात्रंदिन तुम्हाला माझ्या विचारापायी झोपही तुम्हा लागेना.. मी लहान मूल असो,तरुण असो की म्हातारी तरी दृष्ट नजरा माझी शिकार करायला टपलेल्या दिसतात.. त्यांची शिकार तर मी होणार नाही ना या विवंचनेत तुमची झोपही उडते समजते मला तुमची आतुरता,तळमळ .. पण,तो पुरुष ही एक मायचा तुकडाच असतो तरी असे अघोरी कृत्य कसा करतो?.... त्याची माय,बहिण,...