ओतूर - राष्ट्र सेवा परिषद आणि मराठबोली संस्था ,पुणे यांच्या वतीने, दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना व विविध साहित्यकृतींना राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन केल्या जाते. यावेळेस श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ओतूर येथील कवी,लेखक रणजित पवार लिखित व लेण्यांद्री प्रकाशनाने प्रकाशित केलेले, देशातील पहिली महिला कुस्तीपटू ममता पहिलवान या पुस्तकास ' राज्यस्तरीय प्रभुरत्नाई साहित्य गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. १०० वर्षापूर्वी सिन्नर तालुक्यातील पाटोळे या गावची महिला ममता पहिलवान यांनी कुस्तीक्षेत्रात फार मोठे नाव कमावले होते. त्याकाळात पुरुषासंगे संपूर्ण कपडे काढून फक्त लंगोट घालून आखाड्यात उतरत असे.त्यांनी त्यांच्या आयुष्यात जेवढ्या कुस्त्या खेळल्या तेवढया संपूर्ण जिंकल्या.त्यांची परिसरामध्ये 'ममत्या पहिलवान ' म्हणून आजही ओळख आहे. त्यांचे जीवनचरित्र म्हणजे आजच्या तरुणांसाठी,खास करून मुली व महिलावर्गासाठी एक आदर्श आहे.प्रेरणा देणारे आहे.कारण ज्या काळात महिलांवर अनेक बंधने होती.त्याकाळात पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्तीखेळामध्ये ममता पहिलवान पुरुष बनून नि...