Skip to main content

Posts

Showing posts from September 5, 2024

लेखन :- वास्तविकतेचे ज्ञान देणारे शिक्षक (शिक्षक दिन)

शिक्षक हे असे मार्गदर्शक... जे ज्ञानदक्षिणा जरी घेत असले... तरी मुलांना ज्ञान शिदोरी तळमळतेने देत असतात.         आमचे शिक्षक पहिल्या दिवसापासून सांगायचे, मुलांनो महाविद्यालयात आलात म्हणजे अभ्यास संपला,अन् मज्जा,मस्ती ,फिरणे,मनाला येईल तसे वागणे नव्हे.महाविद्यालयात प्रवेश केलात म्हणजे तुम्ही मोठे झालात.जबाबदार झालात. महाविद्यालयीन ज्ञान तुम्हाला खऱ्या जीवनात जगताना,स्वबळावर उभे राहताना उपयोगी पडणार आहे.मज्जा मस्ती,दंगा शालेय वयात केलात तेवढे पुरे झाले आता.                पण काही मुले मात्र महाविद्यालयात गेल्यावर कानात वारे शिरावे तसेच वागायचे.शिक्षकांनी कितीही सांगितले तरी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचे.असे वागणे त्याच मुलांचे होते,ज्यांना अभ्यासाची आवडच नसायची.आम्ही मात्र असे नव्हतो.              काही मुले खुप हुशार,शांत,अभ्यास एके अभ्यास, कोणाशी बोलणे नाही,अभ्यास करून शिक्षकांच्या मनावर राज्य करणारी,पण आम्ही यातले सुद्धा नाही बरं का...!       ...