Skip to main content

Posts

Showing posts from September 3, 2024

🙏 सेवा 🌹

 पाटी पुस्तक ज्ञानदेवता  'सेवा'शिक्षकांची ढाल  संस्कार शिदोरी घेऊन  उजळू यशस्वी मशाल...१  साक्षरतेचा मंत्र जपण्या  निरक्षरता समूळ दूर करु   विज्ञानाच्या दिव्य तेजाने  ध्येयाचा गाठू महामेरु ...२  शिस्तीचे करून पालन  देतो आम्ही आकार  करू अनेकविध क्षेत्रात  स्वप्न विद्यार्थ्यांचे साकार...३  करून ज्योतीस प्रार्थना  दे आम्हांस सूर्यतेज   सुखसमृद्धीची पहाट  घरोघरी उजळतो आज...४  सौ जयश्री पंकज बोरसे,   कल्याण( सहशिक्षिका:  बालभवन मराठी प्राथमिक शाळा अंबरनाथ )