Skip to main content

Posts

Showing posts from January 31, 2025

साहित्यरंग साहित्य मंच नाशिक द्वारा अंगुलिमाल उराडे सन्मानित

सुनील शिरपुरे/यवतमाळ  सोमवार दि.२७ जानेवारी २०२५ रोजी कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय, मानस सेवा केंद्र, मायको हॉल सिडको नवे नाशिक येथे मोठ्या उत्साहात पुरस्कार सोहळा व कवी संमेलन पार पडले. या सोहळ्याचे आयोजन साहित्यरंग साहित्य मंच नाशिकच्या वतीने करण्यात आले होते.         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मा.रविकांत शार्दुल, स्वागताध्यक्षपदी नाशिकचे ज्येष्ठ कवी मा.सुभाष उमरकर, प्रमुख अतिथी ज्येष्ठ लेखिका मा.सौ.इंदिरा जाधव जळगाव तर प्रमुख पाहुणे मा.हर्षवर्धन संजय सोनवणे, मा.सुहास टिपरे, युवा उपस्थिती मा.अश्विनी सांगळे, युवा कवी वक्ते व्याख्याते सुशीलकुमार देवराव शिंदे उपस्थित होते. वरील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या २१ व्यक्तींना समाज सेवा सन्मान, साहित्यरत्न, नारी रत्न असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्यामधील सावली तालुक्यातील जांब (बुज) या छोट्याशा खेडेगावातील रहिवासी कविवर्य अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांना समाजसेवा सन्मान पुरस्कार - २०२५ हा ...

*अजय चव्हाण यांच्या "अभंगसरीता" काव्यसंग्रहाचे प्रकाशन तसेच चंद्रशेखर भुयार यांची गझल मैफील*

       युवा ज्योती सांस्कृतीक मंच दारव्हा तर्फे २८ जानेवारीला गझलकार चंद्रशेखर भुयार (बादशाह) यांची मराठी गझल मैफल तसेच तालुक्यातील, तरनोळी येथील युवा कवी अजय रमेश चव्हाण यांच्या "अभंगसरिता" ह्या अभंग संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम सुखकर्ता हॉल दारव्हा येथे संपन्न झाला. गझलकार चंद्रशेखर भुयार (बादशाह) यांचे हस्ते "अभंगसरिता" पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनूदानातून हा अभंग संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. प्रारब्धात काय । कशाला बघावे । हसून जगावे । आयुष्याला ।। कशाला करावे । उद्याचे विचार । स्वप्नाला साकार । आज करा ।। प्रारब्धावर अवलंबून न राहता स्व प्रयत्नाने आपली स्वप्ने साकारली पाहिजे असा वास्तववाद सांगणारे अभंग अजय चव्हाण यांनी ह्या संग्रहात मांडले आहेत.  अभंगसरिता प्रकाशनानंतर गझलकार चंद्रशेखर भुयार (बादशाह) यांची गझल मैफल रंगली. बादशहा यांनी सादर केलेल्या बहारदार गझलांना रसीकश्रोत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला.श्रोत्यांना खिळवून ठेवत शेतकऱ्यांची व्यथा तसेच सामाजिक,राजाकिय,तरुणाई,...