Skip to main content

Posts

Showing posts from March 4, 2025

आपली सुरक्षा

 करू स्वतःचं सुरक्षा  धडे घेऊ आत्मरक्षा  कमवु शरीर यष्टी  तत्पर असूत रक्षा. सोबत इतरांचीहि  घेऊ काळजी सारीच  दृष्ट्रावर पडु भारी  मित्र मैत्रीत यारीच. लढायची ती तयारी  एक राहू सारी जन  सु राष्ट्र करू निर्माण  ठेवुत शांतीचं मन. वसाच सुविचारांचा  निर्माण करू माणसा  साथ देऊ दिन दुःखी  झोडपू दृष्ट दिवसा. शक्ति करू बळकट  हात घेऊन हातात  वार करतं पोटात  वावरू सारी थाटात.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055