Skip to main content

Posts

Showing posts from October 10, 2024

स्वर्गीय रतनजी टाटा एक अद्वितीय व्यक्तिमत्व.

भारताचे भाग्यवान अद्वितीय व्यक्तिमत्त्व मोती तेजस्वी निर्मळ समजून घ्यावे सत्त्व.. बुद्धिवंत, कीर्तीवंत  हरपला प्रिय तारा  माणुसकी पुजाऱ्यास भेटण्यास जमा दारा...        तारा हा खूप तेजस्वी असतो,तो जळतो अन् सर्वांना प्रकाश,उष्णता ऊर्जा प्रदान करतो.तसेच तुम्ही होता आमच्या सर्वांसाठी.तुमच्या कार्याने कोणीही अचंबित होईल असे तुमचे अद्वितीय तुमचे कार्य आहे.त्याची सर कशालाच येणार नाही.तुम्ही निरपेक्ष पणे सर्वांना मदतच करत गेला.स्वार्थ तुमच्या मनालाही शिवला नाही.तुम्ही ध्येयाने प्रेरित होता,अन् त्यासाठी अतोनात कष्ट घेतले.अथक परिश्रम केले.हार कधी मानली नाही.अपयश जरी सुरुवातीला आले तरी खचून कधी गेले नाहीत.तरुणांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिले.स्वप्न पहायला शिकविले.अन्,ते पूर्ण करण्यास सतत प्रयत्न ही करायला शिकवले.महत्त्वाचे तुम्ही माणूस म्हणून जगलात.कोणतीही श्रीमंतीची हवा तुम्हाला लागली नाही.सर्वांचे नेहमी पोट भरत राहिलात.        स्वर्गीय रतनजी टाटा,तुमच्यासारखा नेक,चमकता,माणुसकीचा पुजारी, परिश्रमी,ध्येयवान,तेजस्वी हिरा, भारताला पुन्ह...