Skip to main content

Posts

Showing posts from November 28, 2024

चंद्रपूर मधील जांब (बुज) येथील अंगुलिमाल उराडे यांचा पुण्यात सन्मान

संस्थापक सागर भाऊ वाघमारे, अध्यक्षा पिंकीताई सागर भाऊ वाघमारे यांच्या युवा प्रबोधन साहित्य मंच पुणे महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या वतीने पुणे जिल्हा येथील सौ. पुष्पावती दशरथ बहुले सभागृह, नाना - नानी पार्क तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण व कवी संमेलन रविवार दि.२४ नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडलेल्या सोहळ्यामध्ये चंद्रपुर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील जांब (बुज) या खेडेगावात वास्तव्याला असलेले लेखक, कवी, सर्पमित्र तथा सामाजिक कार्यकर्ते अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांना "युवा महाराष्ट्र आदर्श समाज भूषण पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री.डॉ.अमरजी चौरे, स्वागताध्यक्ष श्री.संजय कुलकर्णी, प्रमुख मार्गदर्शक मा.देवीलाल रौराळे अमरावती, मा.नितीन सुर्यवंशी, मा.हरेशभाई देखणे (डायरेक्टर), व्याख्याते प्रा.संपत गारगोटे, मा.आरोही हिवरकर अभिनेत्री, मा.रेखा गायकवाड अभिनेत्री, श्री.क्रांतीनाना मळेगांवकर (फेम न्यू होम मिनिस्टर), हेमंत थोरात (सिने निर्माता), निलेश चौधरी (युवा उद्योजक) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार ...