*कोकण मराठी साहित्य परिषद**ठाणे शहर शाखा आयोजित* *विषय:-मराठी भाषा: आजची परिस्थिती आणि साहित्य संस्था.**एक आगळावेळा परिसंवाद*
ठाणे : दिनांक २३ मार्च २०२५ रोजी ठाणे महानगर पालिकेच्या मराठी शाळा क्रमांक १३ खोपट येथील शाळेच्या हाॅलमध्ये कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखेतर्फे... मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी सदर कार्यक्रम आणि पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. संतोष राणे शारदा प्रकाशन, मा. ज्योती कपिले जे के मिडिया, मा.किशोर भोईर अस्मिता वाचनालय, डॉ. मनोज वैद्य , अध्यक्ष आणि, सूत्रधार व निवेदक श्री मोरेश्वर बागडे यांच्या अथक प्रयत्नातून मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील त्यासाठी आपले नागरिक म्हणून योगदान तसेच पत्रकार, साहित्यिक आणि साहित्य संस्था मिळून काय करता येईल याबद्दल परिसंवादाचे सूत्रधार श्री मोरेश्वर बागडे यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर मंडळींनी परखड विचार मांडले. त्यावेळी कार्यक्रमाला हजर असलेले ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे ओतूरकर यांनी मराठी भाषेला हे दिवस कोणी आणले? असा प्रश्न प्रेक्षक म्हणून व्याख्याते व रसिक प्रेक्षक यांना विचारला. त...