==================== *१९ व्या शतकात आधुनिक भारताची जडणघडण करण्यात राजर्षि शाहु महाराजांचा खुप मोठा वाटा आहे. म्हणुनच ते आधुनिक भारताचे व लोकशाहीचे जनक ठरतात.* *कोल्हापुर संस्थानात वारस नसल्यामुळे कागलच्या घाडगे घराण्यातील यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेण्यात आला.हाच यशवंत पुढे राजर्षि शाहु महाराज झाले.त्यांची कारर्किद बहुजनांच्या लोककल्याणासाठी गेली.बहुजनांच्या झोपडीत विकासाचा प्रकाश गेला पाहिजे यासाठी हा ज्ञानभास्कर आपलं आयुष्य समर्पित करता झाला.* *आज सन २००० साली केंद्रशासनाने सक्तीचा व मोफत प्राथमिक शिक्षण हक्क कायदा केला तो शंभर वर्षापुर्वी कोल्हापुर संस्थानात शाहु राजांनी लागु केला होता.बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत,शाळेत टिकली पाहिजेत,आणि ते मोठी झाली पाहिजेत हे स्वप्नं शाहुनी साकार केलं.जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना १ रुपया दंड लावला.बहुजनांच्या मुलांसाठी शाळा काढल्या,वस्तीगृहे बांधली.तेली,तांबोळी,मराठा,माळी,धनगर,सनगर,लिंगायत,जैन,सुतार अशी वस्तीगृह काढू...