जे जे रुग्णालयात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या जल्लोषात साजरा ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जे जे रुग्णालय येथे मराठी भाषा गौरव दिनाचा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाचे प्रेरणास्थान असलेल्या जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे मॅडम या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच जे जे रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संजय सुरासे यांचे मार्गदर्शन कार्यक्रमास लाभले. बधिरीकरण शास्त्र विभागाचे डॉ. कुंदन गोसावी डॉ. अश्विन सोनकांबळे यांनी निबंध स्पर्धा, काव्यवाचन, पुस्तक ओळख, पोवाडा मराठी गाणी आदींचा समावेश करून कार्यक्रम सुंदरपणे पार पडला. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विविध पुरस्कार प्राप्त श्रीमती वर्षा फटकाळे वराडे या उपस्थित होत्या. मा. अधिष्ठाता डॉ. सापळे आणि विशेष अतिथी, श्रीमती वर्षा वराडे यांनी मराठी भाषेचा इतिहास व थोरवी सांगून आपल्याला दैनंदिन कामकाजात मराठी भाषा जास्तीत जास्त कशी वापरात आणता येईल याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या व्यस्त रुग्णसेवा आणि प्रशिक्षण यातून वेळ काढून वरिष्ठ डॉक्टर्स, प्राध्यापक, नर्सिंग स्टा...