पालघर : दिनांक ९/२४ "धनंजय कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ उर्से" यांच्या सौजण्याने दरवर्षी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच नाव लौकिक केलेल्या तरुण वर्गाचा सत्कार केला जातो आणि त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या जातात. या वर्षी कवी. संदीप पवार यांना ही गावकऱ्यांच्या वतीने गणेशउत्सवाचे निमित्त साधून मंडळाचे अध्यक्ष श्री.राजकुमार पाटील श्री.विराज पाटील ,ज्येष्ठ नागरिक श्री.राजू पाटील तसेच गावातील विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करणारे श्री.विजय जाधव सर ,पत्रकार संतोष पाटील तसेच गावातील ग्रामस्थांच्या वतीने संदीप पवार यांचा शाळ ,श्रीफळ , पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला . कवी.संदीप पवार यांचे पालघर जिल्ह्यातील डहाणू मधील उर्से हे गाव . याच गावात ते लहानाचे मोठे झाले .खऱ्या विचारांचं सिंचन याच गावातून झाले.इथल्या वरिष्ठ तसेच गुरूंच्या मार्गदर्शनाने , आई वडिलांच्या ,कुटुंबाच्या आशीर्वादाने आज संदीप पवार यांना कवी ,लेखक ही उपाधी मिळाली. संदीप पवार यांचा ' प्रतिकार ' हा काव्य संग्रह काही महिन्यापूर्वी प्रकाशित झाला .या वर्षी संदीप पवार यांना "आ...