Skip to main content

Posts

*उर्से गावात कवी.संदीप पवार यांचा धनंजय कला , क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सत्कार

  पालघर : दिनांक ९/२४  "धनंजय कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ उर्से" यांच्या सौजण्याने दरवर्षी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच नाव लौकिक केलेल्या तरुण वर्गाचा सत्कार केला जातो आणि त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या जातात. या वर्षी कवी. संदीप पवार यांना ही गावकऱ्यांच्या वतीने गणेशउत्सवाचे निमित्त साधून मंडळाचे अध्यक्ष श्री.राजकुमार पाटील श्री.विराज पाटील ,ज्येष्ठ नागरिक श्री.राजू पाटील तसेच गावातील विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करणारे श्री.विजय जाधव सर ,पत्रकार संतोष पाटील तसेच गावातील ग्रामस्थांच्या वतीने संदीप पवार यांचा शाळ ,श्रीफळ , पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला . कवी.संदीप पवार यांचे पालघर जिल्ह्यातील डहाणू मधील उर्से हे गाव . याच गावात ते लहानाचे मोठे झाले .खऱ्या विचारांचं सिंचन याच गावातून झाले.इथल्या वरिष्ठ तसेच गुरूंच्या मार्गदर्शनाने , आई वडिलांच्या ,कुटुंबाच्या आशीर्वादाने आज संदीप पवार यांना कवी ,लेखक ही उपाधी मिळाली. संदीप पवार यांचा ' प्रतिकार ' हा काव्य संग्रह काही महिन्यापूर्वी प्रकाशित झाला .या वर्षी संदीप पवार यांना "आ...

यांचा घरगुती गणपती बाप्पा आपली कृपाभिलाषी सौ. सरोज गाजरे भाईंदर

सालाबादप्रमाणे यंदाचा उज्वल मित्र मंडळ, भाईंदर , ठाणे (खानदेशचे रहिवासी ) यांचा हा ४७ वा गणपती माझी जाऊ यामिनी गोपाळ गाजरे, दत्तात्रेय भवन, भाईंदर पूर्व येथे स्थापित झाला. जवळपास २०० कुटुंब एकत्र येऊन दरवर्षी हा गणपती मंडळातील एका सदस्याकडे आणून सर्व मिळून साजरा करतात. मी सौ. सरोज सुरेश गाजरे भाईंदर ठाणे यांच्याकडे हा मान यापूर्वी तीनवेळा येऊन गेलाय. या वर्षीचा गणपतीचे येत्या १२ सप्टेंबर गौरी बरोबर विसर्जन करण्यात येणार आहे.  रविवारी आठ  तारखेला सत्यनारायण महापूजा अन् महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . बहुतेकांनी गणपतीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री. लढे यांचं खानदेशी थाटाचं जेवण इतरांना ही खूप आवडलं. पत्ता : दत्तात्रेय भवन, अभिनव शाळेजवळील इमारत. भाईंदर, पूर्व  आपली कृपाभिलाषी  सौ. सरोज गाजरे भाईंदर