Skip to main content

Posts

नेवासा येथील उपोषणाला बसलेल्या दोन समाज बांधवांनी घेतली प्रवरा नदीत उडी.

नेवासा येथील उपोषणाला बसलेल्या दोन समाज बांधवांनी घेतली प्रवरा नदीत उडी. भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम  धनगर समाजाला एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता नेवासा येथे उपोषणाला बसलेले सहा उपोषण कर्त्या पैकी प्रल्हाद सोरमारे,व बाळासाहेब कोळसे यांनी प्रशासन उपोषणा कडे लक्ष देत नाही म्हणून प्रवरा नदी मध्ये उडी घेतली.तेथील धनगर समाज बांधवांनी त्यांचे शोध कार्य चालू ठेवले आहे.तमाम धनगर समाज बांधवांनी या ठिकाणी यावे असे आवाहन तेथील धनगर समाज बांधव करीत आहेत.