Skip to main content

Posts

चारकोप विधानसभा राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार प्राचार्य सौरभ शुक्ला यांचे पारडे जड.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. चारकोप विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार प्राचार्य सौरभ शुक्ला एम.ए.एम.ईडी. यांचे विधान सभा निवडणुकीत पारडे जड असल्याचे निदर्शनास येत आहे.भाजपा, काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष,व इतर अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरलेले असून या म़ध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार प्राचार्य सौरभ शुक्ला हे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व निवडणूक लढवित आहेत.अतिशय मृदू भाषा, राजकीय क्षेत्रातील प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्त्व, सामाजिक कार्याची आवड असलेली व्यक्ती, सध्या चारकोप कांदिवली विभागात चर्चेचा विषय बनली असून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांनी चारकोप विधानसभे साठी योग्य उमेदवाराची  निवड केल्याचे नागरिकांत बोलले जाते.प्रसार माध्यम, जनसंपर्क, सामाजिक क्षेत्रातील कार्य,या मध्ये ही प्राचार्य सौरभ शुक्ला यांचे नाव अग्रेसर असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत चारकोप विधानसभा विभागात सध्या प्राचार्य सौरभ शूक्ला यांचे पारडे जड असल्याचे सर्वत्र बोलले जाते.आमचे मुंबई कांदिवली पश्चिम येथील प्रतिनिधी भारत कवितके...