Skip to main content

जीवनी आलो तर अर्थ पण समजून घेऊ - सौ. वसुधा वैभव नाईक.

  
      अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे आयोजित तिसरे राज्यस्तरीय राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलन याच्या संमेलन अध्यक्ष माननीय सौ.वसुधाताई नाईक, सुप्रसिद्ध साहित्यिका या होत्या.
    संमेलनाचे उद्घाटन  अ. भा.म. सा. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रा. शरद गोरे यांनी केले.          
.जि.संघटक,शिवसेना  मा. श्री. निलेश दादा काळभोर  व अ. भा. म. सा. प. उपाध्यक्षा श्रीमती शुभांगी ताई राजकुमार काळभोर हे होते.
    मा.शरदजी गोरे यांनी आपल्या भाषणात माणसाच्या भावना,चेतना याचे बिजारोपण साहित्यिक करत असतात. माणुसकी हा एक धर्म आहे. आणि स्त्री-पुरुष ही जात आहे. लालसा कोणाच्याही मनात नसावी. स्त्रीचे स्थान खूप मानाचे आहे. त्याचप्रमाणे संमेलनाचा रथ अनेक साहित्यिकांच्या  हाताने पुढे नेला जातो असे त्यांनी सांगितले.
  मा. सौ. वसुधाताई नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय  भाषणाला गणेश वंदनाने सुरुवात केली. स्वर्गीय राजकुमार काळभोर यांचा थोडक्यात परिचय दिला. हा सन्मान शरद गोरे यांच्या मुळे मिळाला आहे सांगितले.
    निसर्गाचे आपण थोडे ऋण मानण्यासाठी आपण पर्यावरण सांभाळू या, वृक्षारोपण करून आपली सामाजिक बांधिलकी जपूया असेही त्यांनी सांगितले.
  निसर्ग माझा सखा 
  निसर्ग माझा गुरु 
  उपकार त्याचे जाणू
  सदैव त्याला स्मरु 
 त्या चारोळीतून त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या.
   जीवनी आलो आहोत तर अर्थ पण समजावून घेऊ. या विषयावर बोलताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा फुले यांची उदाहरणे दिली.
   'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे त्या सामाजिक सेवा करतात त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली.
   सर्वांची सेवा करताना जो आनंद मिळतो तो लाख  मोलाचा असतो असे त्यांनी सांगितले.
    तसाच आणखी एक विचार त्यांनी मांडला- जर लेखन झालेच नसते तर! 
   तर साहित्यिक निर्माण झाले नसते. रामायण महाभारत आपल्याला समजले नसते. संतांची वाणी समजली नसती. पुस्तके वाचनाने आपले मतपरिवर्तन होते हे झाले नसते. आपल्याला थोरांचे ज्ञान माहित झाले नसते. असे अनेक विषय त्यांनी हाताळले.
   सुविचारातून माणूस घडतो. छोट्या छोट्या चारोळीतून मोठा अर्थ लपलेला असतो.कवितेच्या पाच कडव्यात पूर्ण जीवन सार असते.
    तर कविता लिहा,कविता वाचा,कविता ऐकवा अशा संमेलनामुळे आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते त्याचा आपण फायदा घ्यावा. असे संमेलनाअध्यक्ष  यांनी आपले विचार मांडले. सर्व कवींचे खूप, खूप कौतुक केले.
   सरते शेवटी त्यांनी मुख्य संयोजकांचे म्हणजेच मा. प्रा. सुरेश वाळेकर, मा. ज्ञानेश्वर धायरीकर, प्रा. किरण जाधव, मा. शुभम वाळुंज  यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...