Skip to main content

लेखन :- वास्तविकतेचे ज्ञान देणारे शिक्षक (शिक्षक दिन)


शिक्षक हे असे मार्गदर्शक...
जे ज्ञानदक्षिणा जरी घेत असले...
तरी मुलांना ज्ञान शिदोरी तळमळतेने देत असतात.

        आमचे शिक्षक पहिल्या दिवसापासून सांगायचे, मुलांनो महाविद्यालयात आलात म्हणजे अभ्यास संपला,अन् मज्जा,मस्ती ,फिरणे,मनाला येईल तसे वागणे नव्हे.महाविद्यालयात प्रवेश केलात म्हणजे तुम्ही मोठे झालात.जबाबदार झालात. महाविद्यालयीन ज्ञान तुम्हाला खऱ्या जीवनात जगताना,स्वबळावर उभे राहताना उपयोगी पडणार आहे.मज्जा मस्ती,दंगा शालेय वयात केलात तेवढे पुरे झाले आता.
               पण काही मुले मात्र महाविद्यालयात गेल्यावर कानात वारे शिरावे तसेच वागायचे.शिक्षकांनी कितीही सांगितले तरी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचे.असे वागणे त्याच मुलांचे होते,ज्यांना अभ्यासाची आवडच नसायची.आम्ही मात्र असे नव्हतो.
             काही मुले खुप हुशार,शांत,अभ्यास एके अभ्यास, कोणाशी बोलणे नाही,अभ्यास करून शिक्षकांच्या मनावर राज्य करणारी,पण आम्ही यातले सुद्धा नाही बरं का...!

              मी आणिक माझे मित्रमैत्रिणी.आमचा ग्रुपच वेगळा होता.विचारांनी देखील.आम्ही मज्जा,मस्ती करायचो.रुसवे,फुगवे असायचे.तितकेच अभ्यासही करायचो.शिक्षकांना केव्हा प्रेमळ तर केव्हा मस्तीखोर वाटायचो.शिक्षक आणि आमचं नातं मैत्रीपूर्ण खरेपणाचे असायचे.
                मनी एक,दाखवायचे एक असे कधी वागणे जमलेच नाही. कोणालाही घाबरणे नाही, तेवढाच स्पष्टवक्ते ठासून भरलेला,आत्मविश्वासू व्रुत्ती,खरेपणाचीच साथ,प्रामाणिकपणा स्वतःशीही आणि शिक्षकांशीही,बिनधास्त राहणीमान, प्रत्येक उपक्रमात उत्साह असायचा,असे आमचे वागणे होते.आपण खरे आहोत तर इतरांना का घाबरायचे अशी विचारधरणी ठेवून मदतीच्या बाबतीत जमेल तशी मदत करत राहायचे.असे आमचे वेगळेच आयुष्य जगतं होतो.कोणत्याही प्रकारे मन दुःखी झाले.तरी देखील स्वतंत्र जगायची वागायची,ठरवायची,वेगळीच ऊर्जा होती अंगी.
           शाळा, महाविद्यालये असे जीवनटप्पे होते.जिथे पैसे मिळत नव्हते.मात्र स्वतंत्रता होती.आमच्या कलागुणांचे व्यासपीठ होते.त्या मोबदल्यात शाबासकीची थाप मिळत होती.त्याहून किमती पैश्यापेक्षा मौल्यवान मिळत होते ते मानसिक समाधान,सुखद भावना.

तिथे नव्हती कोणतीच
जात,धर्म,भेदभाव.
तिथे होते ते फक्त
वास्तविक ज्ञान देताना,
जगात असलेली माणसे
कशी वागतात,बोलतात.
आपले वय वाढत जाताना,
आपल्यासोबत बदलणारे
त्यांचे वागणे,हे कळवळून
सांगणारे प्रत्येक शिक्षक.

                    - कु.श्रद्धा सावंत.
               विरार(सिंधुदुर्ग-मालवण)

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...