Skip to main content

*रस्ता दुरुस्ती मागणीसाठी पत्रकारच उतरले रस्त्यावर*



    जळगाव [ राजेंद्र चौधरी ] :-  रस्त्याच्या दुरुस्ताची सतत मागणी करुन व संबंध अधिका-यांनी लेखी आश्वासन देऊनही रस्त्याच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याच्या दुरुस्ती व रस्त्याच्या आजूबाजूला पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंट गटारींच्या मागणीसाठी जळगाव जिल्ह्याच्या सावदा व सावदा परिसरातील पत्रकारांनाच जनहितार्थासाठी अक्षरशः रस्त्यावर उतरुन रस्ता रोको आंदोलन दुसऱ्यांदा करावे लागले. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनहितार्थ रस्त्यावर उतरुन लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करावे लागले.
      ब-हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर खड्ड्यांमुळे चाळणी झाली असून प्रकल्प अधिका-यांच्या सांगण्यावर अभियंता चंदन गायकवाड यांनी गेल्यावर्षी जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे झालेल्या पत्रकारांच्या उपोषणावेळी लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ववत न झाल्याने ८ आँक्टोबर मंगळवार रोजी रावेर तालुक्यातील सावदा येथे ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाऊंडेशन व  पत्रकारांच्या वतीने दुसऱ्यांदा सावदा येथे आठ तासांचे रस्ता रोको आंदोलन चालले. प्रकल्प अधिकारी शिवाजी पवार व रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांच्या उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्यासमोर ठेकेदार यांनी प्रत्यक्ष महामार्गाच्या कामाला सुरुवात केल्यानंतर व हे काम दीड महिन्यात करु असे सांगितल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत खुला करण्यात आला.
       शहादा, तळोदा, शिरपूर, चोपडा, यावल, रावेर तालुक्यातून मध्यप्रदेश सीमेपर्यंत या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ बि इ यावर २३२ किलोमीटर वरती खराब झालेल्या भागाच्या दुरुस्ती व रस्त्याच्या नव्याने डांबरीकरणासाठी ८२ कोटी रुपये मंजूर झाले असून या कामासाठी काम केले नसल्याने व ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाऊंडेशनला आँक्टोबर २०२३ मध्ये लेखी आश्वासन दिले असूनही काम न झाल्यानेपुन्हा चोपडा ते रावेर पर्यंत मोठशमोठे खड्डे रस्त्यात पडले आहेत. काही ठिकाणी पावसाचे रस्त्यावरुन वाहून जाण्यासाठी सिमेंटची गटार नसल्यामुळे ब-याच वेळा येथे वाहनांचे अपघात होत असल्याच्या घटना घडल्या आहेत.सतत मागणी करुनही रस्ता दुरुस्तीचे काम होत नसल्याने व रस्त्याची समस्या दूर करण्यासाठी सावदा व सावदा परिसरातील पत्रकारांनाच जनहितार्थासाठी अक्षरशः रस्त्यावरच उतरण्याची दुसऱ्यांदा वेळ आली. 
      रस्ता रोको आंदोलनात रावेर यावल सर्व पत्रकार संघटना सहभागी झाले होते. रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. युवानेते धनंजय चौधरी. वंचित आघाडीच्या जिल्हाप्रमुख शमीभा पाटील, सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनीही रस्ता रोको आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दिला. दरम्यान प्रकल्प अधिकारी रस्ता रोको आंदोलना ठिकणी आल्याशिवाय व काम पूर्ववत सुरु झाल्याशिवाय रस्ता सुरळीत करणार नसल्याचे पत्रकारांनी सांगितल्यानंतर प्रकल्प अधिका-यांना धुळे येथून यावे लागले व स्वतः आल्यावर ठेकेदार, प्रकल्प अधिकारी व अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर काम सुरु झाले. सदर काम दीड महिन्यात पूर्ण करु असे आश्वासन दिल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनाच रस्त्यावर  दुसऱ्यांदा आंदोलनासाठी उतरावे लागले.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...