Skip to main content

स्वर्गीय रतनजी टाटा एक अद्वितीय व्यक्तिमत्व.


भारताचे भाग्यवान
अद्वितीय व्यक्तिमत्त्व
मोती तेजस्वी निर्मळ
समजून घ्यावे सत्त्व..

बुद्धिवंत, कीर्तीवंत 
हरपला प्रिय तारा 
माणुसकी पुजाऱ्यास
भेटण्यास जमा दारा... 

      तारा हा खूप तेजस्वी असतो,तो जळतो अन् सर्वांना प्रकाश,उष्णता ऊर्जा प्रदान करतो.तसेच तुम्ही होता आमच्या सर्वांसाठी.तुमच्या कार्याने कोणीही अचंबित होईल असे तुमचे अद्वितीय तुमचे कार्य आहे.त्याची सर कशालाच येणार नाही.तुम्ही निरपेक्ष पणे सर्वांना मदतच करत गेला.स्वार्थ तुमच्या मनालाही शिवला नाही.तुम्ही ध्येयाने प्रेरित होता,अन् त्यासाठी अतोनात कष्ट घेतले.अथक परिश्रम केले.हार कधी मानली नाही.अपयश जरी सुरुवातीला आले तरी खचून कधी गेले नाहीत.तरुणांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिले.स्वप्न पहायला शिकविले.अन्,ते पूर्ण करण्यास सतत प्रयत्न ही करायला शिकवले.महत्त्वाचे तुम्ही माणूस म्हणून जगलात.कोणतीही श्रीमंतीची हवा तुम्हाला लागली नाही.सर्वांचे नेहमी पोट भरत राहिलात.
       स्वर्गीय रतनजी टाटा,तुमच्यासारखा नेक,चमकता,माणुसकीचा पुजारी, परिश्रमी,ध्येयवान,तेजस्वी हिरा, भारताला पुन्हा लाभणे शक्य नाही.तुमचे विचार,आचार यांची खोली खूप खोलवर होती.आपल्या भारताची आन,बान,शान तुम्ही होतात.तुम्ही होतात तो पर्यंत संपूर्ण भारताचे बाप झालात...तुमच्याविना आम्ही पोरके झालोत.तुम्ही होतात तोपर्यंत हिंमत,विश्वास होता,आपल्या पाठीशी भक्कम हात आहेत.ते आपला हात धरतील,चालायला शिकवतील.जगण्याचे बळ देत होता तुम्ही.तुमच्यात प्रचंड ऊर्जा होती.प्रत्येकाची काळजी होती.बापासारखे भक्कम पण,कोमल मन तुमच्याजवळ होते.
         येथील प्रत्येकाला फक्त कमावण्याची हाव लागली आहे... देण्याचा दानशूरपणा कोणात पहायला ही भेटत नाही.तुमच्या इतके दानशूर आम्ही कधी पाहिलेले नाही.एकविसाव्या शतकातील तुम्ही आमची प्रेरणा होती,तुम्ही आमची छाया होती..तुम्ही कायम आमच्यावर माया केली,आमच्यावर प्रेम केले,तुमची प्रतिमा आम्ही आमच्या हृदयात कोरली.स्वच्छ,निर्मळ,प्रेमळ,प्रांजळ अशी तुमची प्रतिमा...बोलके चक्षु......तुमच्यामुळे भारताची मान उंचावली होती. माणसातला देव प्रत्यक्ष आम्हाला भेटला होता...पण,जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला...तुमचा आशिष नित्य आमच्या पाठीशी आहे.तुम्ही तुमच्या कार्याने नित्यच आमच्या हृदयात असणार...तुम्ही आहात तेथून ही आम्हाला आशीर्वाद द्याल..याची खात्री आहे.माणसे कमावली होती तुम्ही... माणूस बनून वावरलात.... तुमचे पाय कायम भारत मातेच्या मातीतच होते...भारताच्या कल्याणासाठी तुम्हाला जे जे करणे शक्य होते ते ते तुम्ही करत होता....याचा आम्हाला सार्थ अभिमान होता.तुमच्या सारख्या व्यक्ती भारताला लाभले गौरवास्पद गोष्ट आहे....... तुमच्यातील १०% गुण घेवून जरी माणसांनी वाटचाल केली तरी विषमता दरी मिटेल...सारे विचाराने प्रगल्भ होणे गरजेचे आहे...खूप काही बोलावे वाटते,लिहावे वाटते.....व्यक्त व्हावे वाटते...
         नयनी अलगद आसू जमा होतात.काय गमावले आम्ही याची जाणीव होती. टाटा समूहाच्या नावातच दम होता.तो माणुसकीने तुम्ही नित्य टिकवला.जेथे तुमची गरज पडली तेथे तुम्ही कायम उभे राहिलात.तूमच्याविना आम्ही आता पोरके झालोत.तुमच्यातील प्रेम,जिव्हाळा,अखंड वहावा...असे कोणी तरी पुन्हा जन्मावे.साधी राहणी,स्वावलंबी जीवन,उच्च विचारसरणी,समानता,कोणत्याही कामाची कधी लाज वाटली नाही.प्राण्यांवर ही तितकेच प्रेम होते त्यांचे.जो प्राणीमात्रांवर जीवापाड प्रेम करू शकतो, तो किती पवित्र,निर्मळ,प्रेमळ,हास्याचा झरा असेल.हा प्रेमाचा ठेवा आता काळाच्या पडद्याआड गेला.
            त्यांच्याप्रमाणे आपण घडू,त्यांच्यातील दानशूरपणा आपल्यात येईल,सतत कार्यमग्न असणे,स्वतः पेक्षा देशाचा विचार करणे,समानता,मानवता नांदेल तेव्हा खऱ्या अर्थाने रतनजी सरांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल.

सौ.प्रतिमा अरुण काळे 
निगडी प्राधिकरण पुणे,४४

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...