Skip to main content

ऐन दिवाळीत शिक्षकांची गळचेपी



राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शिक्षकांना निवडणूक कार्यासाठी शाळेतून कार्यमुक्त केले. घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमने बिचाऱ्या शिक्षकांची अवस्था झाली आहे. 3 दिवस शाळा आणि 3 दिवस निवडणूक कार्य अशी तारेवरची कसरत करत गेले 2 महिने शिक्षक करत आहेत. 3 दिवस शालेय कार्य करत असताना त्यांना शालेय जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागल्या. सहामाही परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करून, सहामाही परीक्षा घेऊन निकालही लावून दिले. आणि आता ऐन दिवाळीत जेव्हा सर्व सणाच्या तयारीत आहेत तेव्हा हेच शिक्षक दारोदार भटकून मतदान करा म्हणून जन जागृती करत आहेत. यावरून हे सिद्ध होते की आपल्या समाजात शिक्षक - विद्यार्थी आणि शिक्षणाची कदर नाही. 

प्रत्येक अशैक्षणिक कार्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शिक्षकांनाच सक्तीने शाळा सोडून त्या कामासाठी जुंपले जाते. आणि शैक्षणिक दर्जा घसरत चालला आहे म्हणून बोंब मारणारे प्रशासनातील अधिकारीच या साठी प्रथम जबाबदार आहेत. शिक्षक शाळेत शिकवू शकत नसेल तर शैक्षणिक दर्जा उंचावणार तरी कसा? शिक्षण मिळवणे हा राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे. म्हणून कोट्यावधी रुपये मोफत शिक्षणासाठी सरकार खर्च करत आहे. 
8वी पर्यंत नापास करायचे नाही. हे तत्त्व विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी नाही तर प्रशासनाच्या भविष्यासाठी करून दिलेली सोय आहे असे म्हणायला हरकत नाही. 
सर्व युनियन देखिल विविध पळवाटा शोधत आहेत. त्यांच्या कडूनही कोणत्याही प्रकारचे सकारात्मक फायदे  होताना दिसत नाहीत. 

पालकांचा रोष, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, कामाचा अतिरिक्त वाढणारा ताण, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम या सर्व बाबी फक्त शिक्षकाच्या वाट्याला येत आहेत. आणि शिक्षक देखिल सर्व समाजाचा बोजा स्वतःच्या डोक्यावर घेऊन हतबल होऊन जगतो आहे. ही सामाजिक हेळसांड कधीपर्यंत सहन करावी लागणार याची कल्पना आज तरी कोणालाच नाही.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...